संजय घाटगेंचा भूलभुलैया मंडलिकांना कळत कसा नाही? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

म्हाकवे -  मंडलिक व घाटगे हे युती अभेद्य आहे, असे सांगत आहेत. मात्र, त्यांना वरचेवर आपण एकत्र आहोत, असे का सांगावे लागत आहे? संजय घाटगे सतत भाषणात संजय मंडलिक यांची मरेपर्यंत साथ सोडणार नाही, असे सांगतात आणि दुसऱ्या बाजूला मात्र रात्री परस्पर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश द्या, अशा विणवण्या करीत असतात. त्यांचा हा भूलभुलैया प्रा. मंडलिकांना कळत कसा नाही, याचे आश्‍चर्य वाटते. मात्र, संजय घाटगेंचा हा कावा जनता चांगलीच ओळखून असून, निकालात वास्तव दिसेल, असे प्रतिपादन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ बेलवळे बुद्रुक (ता. कागल) येथील आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी पाटील होते. 
बोरवडे जिल्हा परिषदेचे उमेदवार मनोज फराकटे म्हणाले, ""जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खेडोपाडी विकासाची गंगा पोहोचवणे शक्‍य आहे. यासाठी मतदारसंघात राहून लोकांमध्ये मिसळले पाहिजे. कोल्हापुरात राहून गोरगरिबांच्या शेताच्या बांधावर पोहोचणे कसे जमणार?'' या वेळी नारायण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. 

शिवाजी पाटील यांनी स्वागत केले. सभेस गणपतराव फराकटे, रंगराव पाटील, सखाराम पाटील, महादेव शिंदे उपस्थित होते. 

Web Title: MLA Hasan Mushrif in kagal