भाजपमध्ये बंडखोरी अटळ : आमदार मुश्रीफ

भाजपमध्ये बंडखोरी अटळ : आमदार मुश्रीफ

कोल्हापूर - भारतीय जनता पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात इनकमिंग केले. सर्वांना काही ना काही पद देऊन विधानसभेसाठी तयार केले आहे. आता ही मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. त्यामुळे पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी पहायला मिळणार आहे. कागलमध्ये सेना-भाजप युती झाली, तरी मीच जिंकणार, असा विश्‍वास आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्‍त केला.

ते म्हणाले, ‘‘भाजपमध्ये अनेक लोकांचे इनकमिंग झाले. त्यांना विधानसभेचा शब्द दिला आहे. किंबहुना विधानसभेसाठीच त्यांना खुराक दिला आहे. त्यामुळे निवडणूक लढणे, हा या लोकांसाठी विश्‍वासार्हतेचा प्रश्‍न आहे. त्यामुळे विधानसभेसाठी जेवढी मंडळी भाजपत गेली आहे, ते सर्वजण निवडणूक लढतील.’’

मल्टिस्टेटचा शब्द पाळावा
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गोकुळ मल्टिस्टेट होऊ देणार नाही, अशी घोषणा केली आहे. यावर दादांनी दिलेला शब्द पाळावा, अशी मिश्‍किल टिप्पणी मुश्रीफ यांनी केली. निवडणूक काळात आमदार सतेज पाटील यांना कधी भेटलो नाही. त्यांना भेटूनही काही उपयोग नव्हता. मात्र, २३ मे नंतर त्यांना भेटणार असल्याचेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

अरुंधती यांचे काम उल्लेखनीय
एखादी पत्नी पतीसाठी काय करू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरुंधती महाडिक असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत पती धनंजय यांच्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले. मतदानाच्या दिवशी, अखेरचे मत होईपर्यंत त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत. त्यांचे काम कौतुकास्पद असल्याचे आमदार मुश्रीफ यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com