आणखी आमदार येणार भाजपमध्ये - पृथ्वीराज देशमुख

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

कडेगाव - भाजप केंद्र, राज्यात सत्तेवर असल्याने इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.  जिल्ह्यातील अजून दोन-तीन आमदार पक्षात येणार आहेत. अरुणअण्णा लाड भाजपत येण्यास अनुकूल नसले तरी किरण लाड व शरद लाड यांची भाजपत येण्याची इच्छा आहे. तेव्हा हळूहळू परिवर्तन होईल. अरुणअण्णा कुठेही असले तरी आम्ही एकविचाराने काम करणार आहोत. भविष्यात विरोधकांना विनंती आहे, आम्ही समोर आहेच. तुम्ही आता काय ती तयारी करा. अजून अडीच वर्षांने विधानसभा निवडणुकीवेळी अंगावर आल्यानंतर शिंगावर घेण्याची तयारी आहे, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आमदार पतंगराव कदम यांचे नाव न घेता दिला.

कडेपूर (ता. कडेगाव) येथे कडेगाव व पलूस तालुक्‍यातील भाजप व राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित जि. प. सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार जिल्हाध्यक्ष श्री. देशमुख यांच्या हस्ते झाला. जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह देशमुख, शरद लाड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजाराम गरुड आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, ‘‘पलूस व कडेगाव येथे दोन्ही पंचायत समितीत कमळ फुलले. दोन्ही तालुक्‍यांच्या विकासासाठी पैसा कमी पडू देणार नाही. जिल्हा परिषदेसाठीही आम्हाला दिला जाईल. तेंव्हा विकासाचे कुठलेही काम राहता कामा नये. सर्व सदस्यांनी ताकदीने काम करा. देवराष्ट्रे, सोनसळ येथेही चांगले उमेदवार मिळू लागलेत. तेथेही विजय मिळेल यासाठी ताकदीने प्रयत्न करू.’’

संग्रामसिंह देशमुख म्हणाले, ‘‘पलूस तालुक्‍यातील चारपैंकी चार गट जिंकले. कडेगावातील चारपैंकी तीन जागा जिंकल्या. देवराष्ट्रे गटांची जागा जिंकली असती तर पलूसप्रमाणे कडेगावही काँग्रेसमुक्त झाला असता.’’

राजाराम गरुड म्हणाले, ‘‘जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले. काही विरोधी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी पराभावाची नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचे राजीनामे दिले आहेत. काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनीही राजीनामा द्यावा.’’

जिल्हा परिषद सदस्य रेश्‍मा साळुंखे, शांता कनुंजे, सुरेंद्र वाळवेकर, नितीन नवले, शरद लाड, अश्‍विनी पाटील, पंचायत समिती सदस्य रवींद्र कांबळे, रवींद्र ठोंबरे, मंगल क्षीरसागर, मंदाताई करांडे, मनीषा देशमुख, आशिष घार्गे, सीमा मांगलेकर, आरती तावरे, रामचंद्र वरुडे, दीपक मोहिते, अरुण पवार, मंगल भंडारे यांच्यासह लालासाहेब यादव, हिंमतराव देशमुख, विजय पाटील, सुरेश यादव, विजय करांडे, ॲड. प्रमोद पाटील, प्रतापराव यादव, शाहीर यादव आदी व कार्यकर्ते उपस्थित होते. नथुराम पवार यांनी आभार मानले.

‘‘आठपैकी सात सदस्य भाजप विचारांचे आहेत. पलूस-कडेगावने क्रमांक एकने झेंडा फडकवला. पश्‍चिम महाराष्ट्रात सर्वांत मोठा विजय सांगलीने दिला. जि. प. त भाजप निश्‍तिचपणे सत्ता स्थापन करेल. केंद्र व राज्यात सत्ता आहे. त्याचा उपयोग जिल्ह्यात सामान्यांसाठी करू.’’
- पृथ्वीराज देशमुख,  जिल्हाध्यक्ष भाजप

Web Title: mla involve in bjp