उद्या मुख्यमंत्री राष्ट्रवादीत येणार अशी अफवा पसरेल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

आष्टा - कोण म्हणतंय मी भाजप मध्ये जाणार. या सर्व अफवा आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीमध्ये येणार अशीही अफवा पसरेल. अफवा पसरवणाऱ्या काय ते काहीही पसरवतील, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देऊन त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पडदा टाकला.

श्री. पाटील सांगली जिल्ह्यातील आष्टा येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. श्री. पाटील म्हणाले, मी माझा पक्ष चालवतोय. महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रवादी सत्तेवर येईल. धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार महाराष्ट्रात येईल यावर माझा ठाम विश्वास आहे. लोकसभेला मोदींना मतदान झाले. आता मोदी नाहीत. महाराष्ट्रात अनेक प्रश्न उभे आहेत. यातून आम्हाला जनता निश्चितच साथ देईल.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jayant Patil comment