खोटं वय दाखवून 17व्या वर्षी पंचायत समिती सदस्य झालो: जयंत पाटील

भारत नागणे
रविवार, 15 सप्टेंबर 2019

वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे पूर्ण व्हावी लागतात. असं असताना ही  शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपण वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाल्याचे कबूल केले आहे.

पंढरपूर : वयाच्या 14 व्या वर्षी राजकारणात आलो, तर वय वाढवून वयाच्या 17 व्या वर्षी पंचायत समितीचा सदस्य झालो; असा गौप्यस्फोट शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांनी स्वतःच आज सांगोल्यात शेकापच्या मेळाव्यात केला.

त्यांच्या या वक्तव्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी राजकारणी नेते प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून कसा दुरूपयोग करू शकतात हे जळजळीत वास्तव या निमित्तने समोर आले आहे.

वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदान करण्याचा अधिकार मिळतो, तर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी 21 वर्षे पूर्ण व्हावी लागतात. असं असताना ही  शेकापचे नेते जयंत पाटील यांनी आपण वयाच्या 17 व्या वर्षीच पंचायत समितीचे सदस्य झाल्याचे कबूल केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली आहे. सभा आणि मेळाव्यांमधून अनेक राजकीय नेते भाषण बाजी करतात. अशा वेळी अनेक राजकीय नेते आपली गुपीतं भावनेच्या भरातून सांगून टाकतात. भावनेच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे अनेक नेते अडचणीत आले आहेत. जयंत पाटील यांनी आज केलेल्या वक्तव्यामुळे ते अडचणीत येण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Jayant Patil talked about political career