आमदार जयकुमार गोरेंचा जामीन फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सातारा - विनयभंग आणि अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामिन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते यांनी आज (सोमवार) फेटाळला. 

या प्रकरणी जयकुमार गोरे यांनी उच्च न्यायालयात जाण्यासाठी अंतरिम जामीन मिळावा यासाठी न्यायालयाकडे पुन्हा विनंती अर्ज केला आहे. दुपारी अडीचला त्यावर सुनावणी होणार असून, या निकालावर गोरेंची अटक अवलंबून आहे.

न्यायालयाबाहेर पथके तैनात करण्यात आली होती. २५ नोव्हेंबरला सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

Web Title: mla jaykumar gore bail plea rejected