काँग्रेस आमदार मोहनराव कदमांच्या भाजप खासदार संजयकाकांना शुभेच्छा...!

काँग्रेस आमदार मोहनराव कदमांच्या भाजप खासदार संजयकाकांना शुभेच्छा...!

कडेगाव - सांगली लोकसभेच्या मैदानात विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याविरोधात पतंगराव कदम यांच्या कुटुंबातील कोण याबद्दल तर्क लढविले जात आहेत. त्याचवेळी वडियेरायबाग येथे आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेल्या ज्येष्ठ नेते मोहनराव कदम यांनी खासदारांना ‘अच्छे दिन’च्या शुभेच्छा दिल्या. त्याची समाजमाध्यमांवरूनही चर्चा रंगली.

मंदिरासमोर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामाचा भूमिपूजनाचा समारंभ होता. दोघांनी एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. खासदार पाटील म्हणाले, ‘‘मोहनरावदादा अजातशत्रू आहेत. मला ते आदर्शवत आहेत. सामान्यांशी नाळ कशी जोडायची हे त्यांच्यांकडूनच शिकावे.’’ मोहनरावांनाही संघर्ष हेवेदावे न करता विकासाच्या राजकारणाची अपेक्षा व्यक्त करतानाच. संजयकाकांनीही याच पद्धतीनेच जिल्ह्यात राजकारण केल्याचा दावा केला. त्यांनी यापुढच्या काळात त्यांना चांगले दिवस यावेत अशा शुभेच्छाही दिल्या.

लोकसभेचे मैदान समीप असताना आणि विश्वजित कदमांचे नाव काँग्रेसकडून चर्चेत असताना या  दोघांमधील कौतुकाचा वर्षावर आणि एकमेकांची स्तुती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. 

यावेळी शिवाजी जगताप, शिवाजी गढळे, शंकर मोहिते, राजेंद्र पवार, जयराम मोरे, अक्षय मोरे, सतीश जगताप, दिलीप जगताप, शैलेश पाटील, राहुल माळी, सुरेश जगताप, प्रशांत मोहिते, दीपक देवकर, दीपक जगताप, नारायण वाघमोडे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com