रश्‍मीदीदींना उमेदवारी मिळाली तर मी गप्प बसणार नाही... 

MLA Narayan Patil speaks at Shivsena meeting about Rashmi Bagal
MLA Narayan Patil speaks at Shivsena meeting about Rashmi Bagal

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला मिळणार याचे टेन्शन सर्व नेत्यांना, इच्छुकांना आहे. शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यातही हे दिसून आले. "करमाळ्यात मला तिकीट मिळाले तर रश्‍मीदीदी गप्प बसणार नाहीत आणि त्यांना तिकीट मिळाले तर मी गप्प बसणार नाही' असे आमदार नारायण पाटील यांनी जाहीरपणे सांगितले. हा वाद टाळण्यासाठी माढा मतदारसंघ बाजूला ठेवून सावंत बंधूंनी करमाळ्यातून निवडणूक लढवावी, असा सल्लाही त्यांनी दिला. 

या वेळी आमदार नारायण पाटील यांना उद्देशून बोलताना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत म्हणाले, "उमेदवार कोण असावा हे तुम्ही सांगू नका. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सर्वकाही ठरवतील. त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही. शिवसेनेत शिस्तीला धरून कारभार चालतो. त्यामुळे शिवसेनेचे कुटुंब टिकून आहे, वाढत आहे. तिकीट वाटपाचा विचार आपण करायचा नाही. पक्षप्रमुखांकडून जे आदेश येतील ते आपणास पाळायचे आहेत.'' 

या वेळी बाळासाहेबांच्या आठवणी सांगताना माजी आमदार शहाजी पाटील यांना अश्रू अनावर झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याचे जिवंत ठेवण्याचे काम केले. आयुष्यात एकदा तरी शिवसेनेचा आमदार म्हणून निवडून येण्याचा माझा संकल्प आहे, असे त्यांनी सांगितले. 

मंचावर रश्‍मी बागल-कोलते यांच्या स्वागतावेळी आमदार नारायण पाटील खुर्चीवर बसून होते. आमदार पाटील यांनी आपल्या भाषणात शिवसेनेच्या माध्यमातून करमाळा तालुक्‍यात केलेल्या कामांची माहिती दिली. जलसंधारणमंत्री प्रा. तानाजी सावंत किंवा शिवसेना समन्वयक प्रा. शिवाजी सावंत बंधूंनी माढा तालुक्‍याऐवजी करमाळा तालुक्‍यातून निवडणूक लढविली तर आम्ही दोघे मिळून आपणास निवडून आणू. सावंत बंधूंनी टर्म झाल्यावर रश्‍मी दीदींना उमेदवारी दिली तर हरकत नाही, असे त्यांनी सुचविले. त्यावर रश्‍मी बागल-कोलते यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. जर एखाद्याच्या नशिबात आमदारकी असेल तर कितीही अडचणी आल्या तरी तो आमदार होतोच असेही स्पष्ट केले. 

करमाळ्याच्या नेत्या रश्‍मी बागल-कोलते म्हणाल्या, "आजवर आम्ही राष्ट्रवादीत प्रामाणिकपणे काम केले, आता शिवसेनेसाठी निष्ठेने काम करू. आम्ही पक्षप्रमुखांकडे इच्छा व्यक्त केली आहे, पण कधीच कोणतीही तक्रार घेऊन वरिष्ठांकडे जाणार नाही. आम्ही नवे आहोत, पण आपले आहोत. आधीचे वाद, भांडणे विसरून सर्वांना एकत्र काम करायचे आहे.'' 

अनेक संकटांना तोंड देत शिवसेना खंबीरपणे उभी आहे. शिवसैनिकांनी आम्हाला सांभाळून घ्यावे. आपण सर्वजण शिवसेनेची ताकद वाढवूया. 1995 मध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला मंत्री केले. 
- दिलीप सोपल, माजी मंत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com