कुमारस्वामी विश्वासदर्शक ठराव निश्चित जिंकतील : आमदार प्रणिती शिंदे

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 22 मे 2018

ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि ना खरिदूंगा ना खरीदी करने दूंना म्हणणाऱ्यांनी शंभर कोटींची अॅाफर दिली. काँग्रेस आमदारांचे अपहरणही करण्यात आले. पंधरा दिवस दिले असते तर, आम्ही खूप काही करू शकलो असतो, असे अमित शहा म्हणाले. याचाच अर्थ ते काहीही करायला तयार होते. - आ. प्रणिती शिंदे

सोलापूर - विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये झालेल्या घडामोडी पाहता, ही भाजपमुक्त हिंदुस्थानकडे वाटचाल असल्याचे संकेत आहेत, असे 
आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी निश्चित विश्वासदर्शकठराव जिंकतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केले. 

सामाजिक विषयावरील पत्रकार परिषद संपल्यावर आमदार शिंदे सकाळशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, या निवडणुकीनंतर भाजपची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. भाजपच्या नेत्यांनी साम दाम दंड भेद या नितीचा वापर केला. पण जेडीएस व काँग्रेसचा एकही आमदार फुटला नाही. या घडामोडी म्हणजे षडयंत्राचा पराजय आणि लोकतंत्राचा विजय असे म्हणता येईल. तीस कोटीपासून शंभर कोटी रुपयांपर्यंतचे अमिष दाखवले. पण कोणीही त्यास प्रतिसाद दिला नाही. सत्तेत नसलेल्या पक्षासोबत राहण्याची भूमिका सर्वांनी घेतली. हे सर्वजण जातीवादी पक्षाच्या विरोधात उभे राहिल्याचे चित्र दिसून आले.

ना खाऊंगा ना खाने दूंगा, आणि ना खरिदूंगा ना खरीदी करने दूंना म्हणणाऱ्यांनी शंभर कोटींची अॅाफर दिली. काँग्रेस आमदारांचे अपहरणही करण्यात आले. पंधरा दिवस दिले असते तर, आम्ही खूप काही करू शकलो असतो, असे अमित शहा म्हणाले. याचाच अर्थ ते काहीही करायला तयार होते. विश्वासदर्शक ठरावापूर्वी हे काहीही करू शकतात अशी स्थिती आहे. मात्र धर्मनिरपेक्ष पक्षांनी घेतलेल्या भूमिकेचे मतदारांनी जोरदार स्वागत केले. काँग्रेस व जेडीएसला मिळालेली मते ही भाजपच्या तुलनेत जास्त आहेत. याचाच अर्थ लोकाना भाजप नको आहे. ही स्थिती आमच्यासाठी समाधान देणारी आहे. आम्ही सर्व विरोधक एकत्रित राहिलो तर निश्चितच 2019 मध्ये भाजपमुक्त हिंदुस्तान असे चित्र दिसेल, असेही आमदार शिंदे म्हणाल्या.

राहुल गांधींचे मास्टर स्ट्रोक -
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यामागे काँग्रेस व जेडीएसने जी पाऊले उचलली त्यामागे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचेच मास्टर स्ट्रोक होते. सर्वोच्च न्यायालयात आम्ही केलेल्या सर्व मागण्या मान्य झाल्या. त्यामुळे येडीयुराप्पांना राजीनामा देण्याशिवाय गत्यंतर राहिले नाही, असेही आमदार
शिंदे म्हणाल्या.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: MLA Praniti Shinde comments on Karnataka Elections And BJP