आमदार प्रणिती शिंदे पोलिस ठाण्यात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणात कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि नगरसेवक चेतन नरोटे यांनी सोमवारी सदर बझार पोलिस ठाण्यात हजेरी लावली. 

न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे. खटल्याचा निकाल लागेपर्यंत प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहण्याची तसेच तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे आज सोमवारी सकाळी सदर बझार पोलिस ठाण्यात आल्या होत्या. सही केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

माझ्यावर कितीही गुन्हे दाखल झाले तरी गोरगरिबांसाठी मी कायद्याच्या चौकटीत राहून  लढतच राहीन. सत्ताधाऱ्यांकडून आम्हाला मेंटली टॉर्चर करण्याचा प्रयत्न होतोय पण आम्ही कोर्टाचा निर्णयाचा आदर करतो. आमची लढाई चालूच राहील असे त्यांनी सांगितले.

कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी 2 जानेवारी 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी वेळी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती. प्रकरणी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण आणल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह माजी आमदार प्रकाश यलगुलवार, कॉंग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख हे आरोपी आहेत.

आमदार शिंदे आणि नगरसेवक नरोटे यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. आमदार शिंदे आणि नगरसेवक नरोटे यांना 15 हजार रुपयांचा जातमुचलक्‍यावर जामीन देण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींनी 16 ते 18 सप्टेंबर या कालावधीत सकाळी 10 ते 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून तपासकामात सहकार्य करावे, केसचा निकाल होईपर्यंत दर तारखेला न्यायालयात हजर राहावे, आरोपींनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सरकारी साक्षीदारांवर दबाव आणू नये, त्यांना फूस लावू नये, कोणत्याही अटींचा भंग झाल्यास जामीन रद्द समजण्यात यावा अशा अटी घालण्यात आल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praniti Shinde at the police station