अखेर आमदार प्रणिती शिंदे न्यायालयात हजर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 

सोलापूर : शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याप्रकरणी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आज (गुरुवार) सोलापूर न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत अंतरीम जामीन मिळाला आहे. त्यांना न्यायालयात हजर होण्याबाबत जामीनपात्र वॉरंट बजाविण्यात आले होते. 

या प्रकरणात माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले, अंबादास करगुळे, केशव इंगळे, राहुल वर्धा, बशीर शेख, करीम शेख आदींना याअधीच जामीन मिळाला आहे.

यूपीएस मदान राज्याचे नवे निवडणूक आयुक्त

2 जानेवारी 2018 ला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घातला होता. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांना धक्‍काबुक्की केली होती. या प्रकरणात काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर सरकारी कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा सदर बझार पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. 

- 'इंदापूरबाबत शरद पवारांशी सकारात्मक चर्चा; आता हर्षवर्धन पाटलांनी ठरवावे'

या प्रकरणात सर्व आरोपी 26 ऑगस्टला न्यायालयामध्ये हजर झाले होते. न्यायालयाने सुरवातीस सर्वांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोन दिवसांकरिता अंतरीम जामीन दिला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना जामीन मिळाला आहे. तर आमदार प्रणिती शिंदे आणि गटनेते चेतन नरोटे यांना न्यायालयात हजर राहण्याबाबत समन्स बजाविले होते. आज आमदार प्रणिती शिंदे न्यायालयात हजर झाल्या. त्यांना 9 सप्टेंबरपर्यंन अंतरीम जामीन देण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Praniti Shinde presents in Solapur court