आमदार कदमांची तुरुंगातून फिल्डिंग

प्रमोद बोडके - सरकारनामा ब्युरो
सोमवार, 5 डिसेंबर 2016

सोलापूर - लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार केल्याप्रकरणी तत्कालीन अध्यक्ष व मोहोळ (जि. सोलापूर) राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम सध्या तुरुंगात आहेत. आमदार झाल्यापासून जेमतेम वर्षाचा काळ आमदार कदमांना मिळाला. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत आपले अस्तित्व दाखविण्यासाठी आमदार कदमांनी तुरुंगातून फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. 

राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व असलेल्या मोहोळ या राखीव मतदार संघातून कदम अवघ्या 14 दिवसात आमदार झाले. आमदार कदमांनी माजी आमदार राजन पाटील यांच्याशीच राजकीय पंगा घेतला आहे. माजी आमदार पाटील यांच्या विरोधात रमेश कदमांनी आपला गट निर्माण करायच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सात ते आठ महिन्यांपूर्वी झालेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार कदमांच्या उमेदवारांचा साफ पराभव झाला. सगळ्याच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. 

आता जिल्हा परिषद व तालुका पंचायतच्या निवडणुकीत आपल्या गटाला संधी असल्याचे सांगत मोहोळ तालुक्‍यातील काही कार्यकर्त्यांनी आमदार कदम यांची तुरुंगात जाऊन भेट घेतली. आमदार कदमांनीही झेडपीसाठी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांना कोऱ्या लेटरपॅडवर सह्या दिल्या आहेत. आपल्या गावाला आमदार निधी मिळणार असल्याचे सांगून आमदार कदमांचे कार्यकर्ते जिल्हा परिषदेच्या कामाला लागले आहेत.

Web Title: mla ramesh kadam's fielding from jail