आमदार जगताप यांना न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर, अशी त्यांची नावे आहेत. केडगाव येथील शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे यांची गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह सात जणांना अटक केली. त्यातील आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब कोतकर, बी. एम. ऊर्फ भानुदास कोतकर अकरा दिवस पोलिस कोठडीत होते. त्यांच्या शेवटच्या दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.

'गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक होईपर्यंत वरील तीनही आरोपींची पोलिस कोठडीची मुदत राखीव ठेवून त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी,'' अशी मागणी तपासी अधिकारी निरीक्षक दिलीप पवार यांनी केली. प्रथमवर्ग न्यायालयाने पोलिस कोठडीची मुदत राखून ठेवत तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता सीमा देशपांडे यांनी काम पाहिले.

गिऱ्हे, गुंजाळ उद्या न्यायालयात
गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदीप गुंजाळ आणि आरोपीला गावठी पिस्तूल पुरविणारा आरोपी बाबासाहेब केदार यांची पोलिस कोठडी उद्या (गुरुवारी) संपत आहे, तर आरोपी संदीप गिऱ्हे, महावीर मोकळे यांचीही कोठडी उद्या संपत असल्याने वरील चौघांना उद्या दुपारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Web Title: mla sangram jagtap custody crime murder case