आमदार संग्राम जगताप यांच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नगर - दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची (ता. 16) पर्यंत वाढ केली. आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब एकनाथ कोतकर, संदीप रामचंद्र गुंजाळ, भानुदास कोतकर ऊर्फ बी. एम., बाबासाहेब केदार अशी आरोपींची नावे आहेत. केडगाव परिसरात शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर, कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल आहे.

नगर - दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने पाच दिवसांची (ता. 16) पर्यंत वाढ केली. आमदार संग्राम जगताप, बाळासाहेब एकनाथ कोतकर, संदीप रामचंद्र गुंजाळ, भानुदास कोतकर ऊर्फ बी. एम., बाबासाहेब केदार अशी आरोपींची नावे आहेत. केडगाव परिसरात शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर, कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा पिस्तुलातून गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान, याच प्रकरणात पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी आरोप असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांच्या न्यायालयीन कोठडीतही एक दिवस वाढ करण्यात आली आहे. 

Web Title: MLA Sangram Jagtap custody extended