आमदार जगताप यांना 12 पर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

खूनप्रकरणी आमदार जगताप (रा. भवानीनगर) यांच्यासह संदीप गुंजाळ, बाळासाहेब एकनाथ कोतकर, भानुदास कोतकर उर्फ बीएम (सर्व राहणार केडगाव) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज न्यायालयासमोर उभे केले होते. त्यांना या प्रकरणी 12 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

नगर : केडगाव येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या खून प्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह चौघांना 12 एप्रिलपर्यंत आणि पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणारे नगरसेवक कैलास गिरवले, ऍड. प्रसन्न जोशी यांच्यासह 22 जणांना 10 तारखेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. 

खूनप्रकरणी आमदार जगताप (रा. भवानीनगर) यांच्यासह संदीप गुंजाळ, बाळासाहेब एकनाथ कोतकर, भानुदास कोतकर उर्फ बीएम (सर्व राहणार केडगाव) यांना अटक करण्यात आली असून, त्यांना आज न्यायालयासमोर उभे केले होते. त्यांना या प्रकरणी 12 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

तसेच आमदार जगताप यांना अटक केल्यामुळे काल रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणारे नगरसेवक कैलास गिरवले, ऍड. प्रसन्न जोशी यांच्यासह 22 जणांना 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या सर्वाना आज न्यायालयात आणले त्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होती

Web Title: MLA Sangram Jagtap police custody in Kedgaon murder case