कोल्हापूरचे पालकमंत्रीपद काँग्रेसच्या 'या' आमदारास मिळणार ?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 नोव्हेंबर 2019

राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या 
वाट्याला होते आणि आमदार रामदास कदम यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती.

कोल्हापूर - राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार निश्‍चित झाले असताना राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  त्यात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून आमदार सतेज पाटील यांचे नाव आले आहे. आमदार पाटील यांचे मंत्रिमंडळात नाव निश्‍चित झाले असल्याने त्यांनाच जिल्ह्याचे पालकमंत्री मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

हेही वाचा - शपथविधीसाठी या दाम्पत्याला मातोश्रीवरून निमंत्रण 

राज्यात १९९५ ते १९९९ या काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते, त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे शिवसेनेच्या 
वाट्याला होते आणि आमदार रामदास कदम यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी होती. त्यानंतर सलग पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता महाराष्ट्रात राहिली. आघाडीच्या काळात जिल्ह्याचे पालकमंत्री पद काँग्रेसच्या वाट्याला होते. सुरुवातीची काही वर्षे स्वर्गीय डॉ. पतंगराव कदम यांनी, तर नंतर इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी या पदावर काम केले. 

हेही वाचा - आता महामंडळावर कुणाची वर्णी लागणार? 

सतेज होते लातूरचे पालकमंत्री

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना व भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले, त्यातून सत्तेचा गुंता गेले महिनाभर सुटला नव्हता. काल (ता. २६) सरकार कोणाचे येणार, याविषयीची उत्सुकता संपली आणि जिल्ह्यात मंत्री कोण होणार ? पालकमंत्री पदी कोणाला संधी मिळणार ? या प्रश्‍नांची चर्चा सुरू झाली. आघाडीच्या काळात आमदार सतेज पाटील मंत्री होते; पण त्यांच्याकडे लातूरच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली होती. आज राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादीच सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यात सतेज पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, असा उल्लेख आहे. आठवडाभरात यासंदर्भातील अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

हेही वाचा - विधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणी कोणी लावली आहे फिल्डींग ? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Satej Patil Will Be Guardian Minister Of Kolhapur