आमदार कर्डिले यांच्या जामिनावर आज सुनावणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे.

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले आमदार शिवाजी कर्डिले यांनी जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर उद्या (सोमवारी) सुनावणी होणार आहे.

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात मोडतोड केली. याबाबत आमदार कर्डिले, आमदार अरुण जगताप, दादा कळमकर यांच्यासह 300 जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. कर्डिले यांच्यासह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. सध्या हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांतील कर्डिले, ऍड. प्रसन्ना जोशी, संजय वाल्हेकर आणि सागर वाव्हळ यांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

Web Title: mla shivaji kardile bell result