कर्डिलेंच्या कोठडीत वाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (ता. 12) वाढ करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खूनप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असता त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कार्यालयाची मोडतोड केली होती. याप्रकरणी काल आमदार कर्डिले, अफजल शेख यांना अटक करण्यात आले होते. या दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. ही कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले.

नगर - पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत गुरुवारपर्यंत (ता. 12) वाढ करण्यात आली आहे. आज त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी खूनप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी आणले असता त्यांच्या समर्थकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कार्यालयाची मोडतोड केली होती. याप्रकरणी काल आमदार कर्डिले, अफजल शेख यांना अटक करण्यात आले होते. या दोघांनाही एक दिवसाची पोलिस कोठडी दिली होती. ही कोठडीची मुदत आज संपल्याने त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले. या प्रकरणात त्यांच्या कोठडीत 12 एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्यासमवेत अफजल शेख, सारंग पंधाडे, सुरेश बनसोडे आणि अन्य एकालाही कोठडी वाढविण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Shivaji Kardile police custody