"होय बा' म्हणणाऱ्यांनी तालुक्‍याची वाट लावली 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 फेब्रुवारी 2017

जत -  जिल्ह्यातील कॉंग्रेस वसंतदादांची राहिली नाही, ती कदम कॉंग्रेस झाली आहे. त्यांच्यापुढे "होय बा' म्हणणाऱ्या बीट हवालदारांनी तालुक्‍याची वाट लावली, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली. उमराणी (ता. जत) येथे बिळूरमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. 

जत -  जिल्ह्यातील कॉंग्रेस वसंतदादांची राहिली नाही, ती कदम कॉंग्रेस झाली आहे. त्यांच्यापुढे "होय बा' म्हणणाऱ्या बीट हवालदारांनी तालुक्‍याची वाट लावली, अशी टीका आमदार विलासराव जगताप यांनी केली. उमराणी (ता. जत) येथे बिळूरमधील उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. 

श्री. जगताप म्हणाले, ""वारस व नातेवाइकांचीच भरती करताना त्यांची क्षमता पाहिली जात नाही. त्यामुळेच विक्रम सावंतसारखे लोक तालुक्‍याचे नुकसान करीत आहेत. अभ्यास नाही, माहिती नाही, असे लोक पैशाच्या जीवावर राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कॉंग्रेसच्या जीवावर आमदार झालेले प्रकाश शेंडगे यांनी परवा ग्रहण लागल्याची टीका केली. शेंडगेंना उशिरा सुचलेले शहाणपण आहे. जतच्या वाट्याचा निधी जिल्ह्यातील मंत्र्यांनीच पळवला. पतंगराव कदम, जयंत पाटील व दिवंगत आर. आर. पाटील यांनी आपल्या वाट्याचा निधी स्वत:च्या मतदारसंघात खर्च केला. माजी मंत्री कदम यांनी विभाजन करणे हातात असतानाही केले नाही. तालुक्‍याचा विकास झाला, की लोक विचारणार नाहीत ही भीती वाटते का? आता कारखाना काढण्याची भाषा करीत आहेत. पण सहकारी तत्त्वावर सुरू असलेला कारखाना बंद पाडण्याचे कट-कारस्थान कोणी रचले, हे तालुक्‍याला माहीत आहे. पाच वेळा ऑडिट करूनही हाती काही लागले नाही. '' 

शिवाजीराव ताड, डॉ. श्रीकांत आरळी, शिवाप्पा तांवशी, अप्पासाहेब नामद यांनी मनोगत व्यक्‍त केले. तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुडडोडगी, रामण्णा जिवण्णावर, मंगल नामद व सुशीला तांवशी उपस्थित होते. 

"रोहयो'चा भ्रष्टाचारात कॉंग्रेसच 
"रोहयो' शेतकरी व सामान्यांना दिलासा देणारी योजना होती. मात्र कांही गावांनी भ्रष्टाचार केला. ही सर्व मंडळी कॉंग्रेसची आहेत. चांगल्या योजनेला लागलेली कीड मीच बाहेर काढली. त्यामुळेच पोटात दुखत आहे. माझ्यावर बिनबुडाचे आरोप होत आहेत, असे श्री. जगताप म्हणाले. 

Web Title: MLA vilasrao jagtap in jat