या आमदारांनी दोर लावून काढला चारीत आडकलेला बैल...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

-  मोटेवाडी (ता. माळशिरस) येथील घटना

- चारीत एक बैल चिखलात अडकला होता

- आमदार कार्यकर्त्यांसोबत तरंगफळ येथे जात होते

- बैल सुखरूप बाहेर  काढून आमदार पुढील कार्यक्रमास रवाना झाले

नातेपुते (सोलापूर) : माळशिरसचे आमदार राम सातपुते यांनी मोटेवाडी (ता. माळशिरस) येथील चारीत अडकलेला बैल स्वतः दोर लावून काढल्याने आमदारांमधील एक हाडाचा शेतकरी व निवडणुकीनंतरही सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारा नेता तालुक्‍याने पाहिला आहे. 

हे ही वाचा... बापरे...! कागल - निढोरी मार्गावर बिबट्याचे दर्शन

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की ः आमदार राम सातपुते हे मतदारसंघात एका कार्यक्रमाला जात असताना मोटेवाडी येथे त्यांना चारीत एक बैल चिखलात अडकलेला आढळला. बैलाचे मालक शहाजी भानुदास मोटे हे शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व मंडळीसोबत बैल काढण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, बैल निघत नव्हता. शेतकरी व कुटुंबातील सदस्य व्याकूळ झाले होते. 

हे ही वाचा... एकही कारखाना सुरू नाही, तरीही दररोज आठ हजार मेट्रीक टन उसाची तोडणी

या वेळी राम सातपुते त्या मार्गे आपल्या कार्यकर्त्यांसोबत तरंगफळ येथे जात होते. याप्रसंगी क्षणाचा विलंब न लावता चारीतला बैल स्वतः उतरून बाहेर काढू लागले. शेवटी बैल सुखरूप बाहेर काढला आणि शेतकरी शहाजी भानुदास मोटे यांना राम राम करून आमदार राम सातपुते पुढील कार्यक्रमास रवाना झाले. 

हे ही वाचा... सुखद! निराधार आजीला मिळाले घर अन नात...

आमदार सातपुते म्हणाले, मी लोकांमध्ये रमणारा व दिवस-रात्र काम करणारा कार्यकर्ता आहे. जे दिसलं ते केलं. मी जात असताना बैल पडलेला दिसला. संपूर्ण शेतकरी कुटुंब अगदी महिलांसह बैल काढण्याचा प्रयत्न करत होते. एक बैल शेतकरी कुटुंबासाठी काय करू शकतो याची मला पूर्ण जाणीव आहे, कल्पना आहे. बैलाचा जीव वाचणे माझ्या दृष्टीने खूप खूप महत्त्वाचे होते. म्हणून मी व माझ्या सोबत असणाऱ्या कार्यकर्त्यांनी बैल काढायला मदत केली. एका निष्पाप जनावराचा प्राण वाचला याचा मला आनंद आहे. यापुढे मी असाच उपलब्ध आहे व असेल. ते माझे कर्त्यव्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The MLAs removed the bullock that was stuck in the pasture