‘मनसे’ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १७ प्रभागांतून ३९ उमेदवारांची यादी आहे. जवळपास ७६ उमेदवार उभे करण्याचे ठरले असून उर्वरित यादी बुधवार, गुरुवारी जाहीर होणार आहे. 

सोलापूर - महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात १७ प्रभागांतून ३९ उमेदवारांची यादी आहे. जवळपास ७६ उमेदवार उभे करण्याचे ठरले असून उर्वरित यादी बुधवार, गुरुवारी जाहीर होणार आहे. 

छत्रपती शिवाजी चौकातील मनसे कार्यालयात जिल्हा संपर्क प्रमुख बाबा जाधवराव यांनी यादी जाहीर केली. या वेळी शहराध्यक्ष युवराज चुंबळकर, प्रशांत इंगळे, शहर संघटक उमेश रसाळकर, जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांची उपस्थिती होती. पक्षाने ९७ उमेदवारांची यादी मुंबईला पाठविली होती. त्याची छाननी होऊन पहिली यादी जाहीर झाली आहे. राज ठाकरे यांच्या आदेशावरून बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका निवडणुकीची यादी जाहीर झाली असल्याचे शहराध्यक्ष युवराज चुंबळकर यांनी सांगितले. वरिष्ठ स्तरांवर मनसे, शिवसेनेची संभाव्य युती होण्याच्या हालचाली चालू आहेत. त्यामुळे सोमवारी जाहीर होणारी यादी मंगळवारी जाहीर झाली. मनसे-शिवसेना युती होण्याची आशा खूपच धूसर असल्याचीही चर्चा आहे.

अशी आहे यादी 
प्रभाग तीन : छोटालाल व्यास, प्रभाग चार : सचिन अक्‍कलकोटे, राहुल पाटील, प्रभाग सात : वंदन फडतरे, रमेश कणबसकर, सुभाष माने, प्रभाग आठ : नितीन सिद्धम, रोहन अंजिखाने, प्रभाग नऊ : मीनाक्षी मादास, श्रीधर गुडेली, रवी शिंदे, प्रभाग ११ : श्‍याम काटकर, प्रभाग १२ : नागेश केदारी, चनय्या स्वामी, प्रभाग १३ : संतोष क्षीरसागर, नीता साठे, गोविंद बंदपट्टे, प्रभाग १४ : भारती मन्सावाले, कविता मिरगाळे, अजय देशपांडे, प्रभाग १६ : विशाल बंडे, प्रभाग १९ : मारुती संगा, रेणुका बारड, श्रीदेवी हिरेमठ, सदानंद क्‍यातम, प्रभाग २१ : नूरजहॉं सिद्दीकी, कय्यूम सिद्दीकी, प्रभाग २२ : सुमन खडतरे, राजू जाधव, रेखा साळुंखे, अनिल भिसे, प्रभाग २३ : सुरेश मेंडगुदळे, नारायण कुलकर्णी, प्रभाग २४ : अनसूया भंडारे, करुणा यादव, प्रभाग २५ : अभिजित भंडारे, पूजा उपरे, दीपक भंडारे, प्रभाग २६ : नीलेश भंडारे.

Web Title: MNS first list of candidates