चतु:सीमेसाठी मोबाईल ॲप

राजेश मोरे 
सोमवार, 9 जुलै 2018

कोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या घटना ठिकाणचा पंचनामा करायचा झाला तर चतु:सीमेची गरज भासते. पोलिसांना मोबाईल ॲपद्वारे तंतोतंत व कायदेशीर चतु:सीमा कशी शोधायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अक्षांश आणि रेखांशावर संबंधित मोबाईल ॲपद्वारे घटनास्थळाच्या चतु:सीमा  पोलिसांना सहज प्राप्त करता येऊ लागल्या आहेत. 

कोल्हापूर - खून, मारामारी, दरोडा अशा प्रकारचे गुन्हे घडलेल्या घटना ठिकाणचा पंचनामा करायचा झाला तर चतु:सीमेची गरज भासते. पोलिसांना मोबाईल ॲपद्वारे तंतोतंत व कायदेशीर चतु:सीमा कशी शोधायची, याचे प्रशिक्षण देण्यात आले. अक्षांश आणि रेखांशावर संबंधित मोबाईल ॲपद्वारे घटनास्थळाच्या चतु:सीमा  पोलिसांना सहज प्राप्त करता येऊ लागल्या आहेत. 

गुन्हेगारीच्या घटना घडल्या, की त्या घटनास्थळाचा पोलिसांना पंचनामा करावा लागतो. या पंचनाम्यापासूनच खऱ्या अर्थाने तपासास सुरुवात होते. घटनास्थळी साक्षीदारांकडून पंचनाम्यासंबंधी इत्थंभूत माहिती मिळू शकत नाही. निर्जनस्थळी गुन्हा घडला असेल तर पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर भागातील मोकळी जमीन, शेती कोणाची याची माहिती मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागत होती. मिळालेली माहिती चुकीची निघाली तर न्यायालयीन कामकाजात कमालीच्या अडचणी येत होत्या. मात्र डिजिटल युगात जीपीएस सिस्टीमवर आधारित विविध मोबाईल ॲप आता उपलब्ध झाले आहेत. त्याच माध्यमातून पोलिसांसाठी ‘गेट लॅटिट्यूड अँड लाँगिट्यूड’ (Get Lattitude and Longitude) हे ॲप उपलब्ध झाले. त्याचे प्रशिक्षण पोलिस मुख्यालयातील संगणक प्रशिक्षण विभागातून सर्व पोलिसांना दिले आहे. त्याचा वापर सुरू आहे.

एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होतात. चोऱ्या, लुटमारीचे प्रकार घडतात. अशा घटनास्थळांची माहिती या मोबाईल ॲपद्वारे पोलिसांना उपलब्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वारंवार अपघात घडणारे ठिकाण ‘अपघात स्थळ’ म्हणून निश्‍चित करण्याची प्रक्रिया पोलिसांकडून सुरू झाली आहे. वारंवार चोऱ्या, लुटमारीचे प्रकार घडणाऱ्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविली आहे.

काही संवेदशील भागात कायमस्वरूपी पोलिस चौकी तयार करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. मोबाईल ॲपसह पोलिसांना डिजिटल करण्याचे काम अपर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दिलावर शेख आणि कॉन्स्टेबल सुदर्शन वर्धन करत आहेत.

मोबाईल ॲपचा वापर 
घटनास्थळाची चतु:सीमा 
अपघातस्थळ निश्‍चित करणे
पोलिस गस्त आणि चौकीबाबतच्या उपयाययोजनेस मदत 

 
जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाणी, सहा पोलिस उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना गेट लॅटिट्यूड अँड लाँगिट्यूड या मोबाईल ॲपसह डिजिटल तंत्राचे प्रशिक्षण दिले आहे. 
- दिलावर शेख, सहायक फौजदार, संगणक विभागप्रमुख

Web Title: mobile app easily accessible to the police