शाहूपुरीतील मोबाइल शॉपी चोरीचा छडा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - शाहूपुरी पाच बंगला परिसरातील मोबाइल शॉपी चोरीचा छडा लावल्याचा दावा शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी केला. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत. त्यांची संख्या 10 ते 12 असून ते सर्व जण बिहारचे आहेत. रेकी करून त्यांनी ही धाडसी चोरी केल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना झाले असून, लवकरच त्यांना अटक करू असेही त्यांनी सांगितले.

शाहूपुरी पाच बंगला परिसरातील तथास्तु नावाच्या इमारतीतील "आय पॅलेस' नावाची मोबाइल शॉपी फोडून चोरट्यांनी 32 लाख रुपये किमतीचे मोबाइल संच लंपास केले. हा प्रकार 30 ऑक्‍टोबरला सकाळी उघडकीस आला. शॉपीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटा कैद झाला होता. शाहूपुरी पोलिसांनी परिसरात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आणि दुकानातील कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रफितीचा आधार घेत तपास सुरू केला. त्यात परिसरातील एका लॉजमध्ये पंधरा दिवसांपूर्वी 10 ते 12 परप्रांतीय राहण्यासाठी आले होते. त्यांनी त्या लॉजमध्ये आपल्या ओळखपत्राच्या झेरॉक्‍सही दिल्या होत्या. त्या आणि चित्रफितीत कैद झालेले तीन ते चार संशयितांमध्ये साम्य आढळून आले. त्याधारे पोलिसांनी तपासाची गती वाढवली. त्यात हे सर्व परप्रांतीय बिहारचे असून चोरीच्या दिवासापासून ते पसार झाल्याचेही पुढे आले. त्यांच्या लोकेशनची माहिती घेतली असून विशेष पथकेही बिहारला रवाना झाली आहेत.

लॉज व हॉटेलमालकांना सूचना
दरम्यान आय सायंकाळी पोलिस निरीक्षक प्रवीण चौगुले यांनी हद्दीतील लॉज व हॉटेलमालकांची तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीत त्यांनी अनोळखी व्यक्तींना ओळखपत्राशिवाय रूम देऊ नये, त्यांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक असेल तर संबंधित पोलिस ठाण्याला माहिती द्यावी, लॉज व हॉटेलमध्ये सीसीटीव्ही बसवावेत आदी सूचना केल्या.

Web Title: Mobile sopi theft investigation