खासदारांच्या मठातून मोबाईलची चोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली.

सोलापूर - शेळगी येथील गौडगाव मठात खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांच्या दर्शनासाठी गेलेल्या तिघा भाविकांचे मोबाईल चोरट्याने लंपास केले. ही घटना मंगळवारी (ता. 16) गुरुपौर्णिमेच्या दिवशी घडली.

अनिकेत मडवळप्पा तानवडे, सिद्धाराम शंकरराव यलशेट्टी, विनायक गंगाधर बिंबळगी यांचे मोबाईल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गौडगाव मठात दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्याने तिघा भाविकांचे मोबाईल चोरले. मठात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. चोरट्याचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत केडगे यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Theft in MP Math Crime