शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे मोदी सरकारच देशद्रोही - अजित जगताप

mangalwedha.
mangalwedha.

मंगळवेढा - देशात साखरेचे मोठया प्रमाणात उत्पादन झाले असताना पाकिस्तानातून साखर आयात करुन देशातील साखर उदयोगासह शेतकऱ्याला देशोधडीला लावणारे मोदी सरकारच देशद्रोही असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित जगताप यांनी केला. 

देशातील वाढती महागाई व तेलाचे दर पाहता शहर व ग्रामीण भागातील जनता होरपळून निघत असल्याच्या पाश्वाभूमीवर विविध पक्षाच्या वतीने देशभर बंदचे आवाहन करण्यात आले त्या पाश्वभुमीवर येथील दामाजी चौकात कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, शिवसेना, मनसेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते यावेळी विठठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, नारायण गोवे, चंद्रकांत पवार, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर,
शहराध्यक्ष मारुती वाकडे, महेश दत्तु, युवराज शिंदे, अशोक माने, सामाजिक न्याय विभाग जिल्हाधयक्ष विजय खवतोडे, सरचिटणीस लतीफ तांबोळी, सेवादल जिल्हाध्यक्ष विलास चेळेकर, तालुका अध्यक्ष सुनिल डोके, नगरसेविका अनिता नागणे, नगरसेविका सब्जपरी मकानदार, नगरसेवक बशिर बागवान, भारत बेद्रे, प्रविण खवतोडे, विजय बुरकुल, संजय पाटील, महाविर ठेंगील, संदिप घुले, पंडीत गवळी, संतोष राऊत, अमोल माने, सुभाष बाबर, प्रदिप पवार, आदीसह कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉगे्रस, शिवसेना, मनसेचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. आठवडा बाजारासाठी ग्रामीण जनतेची गैरसोय होवू नये म्हणून बाजार सुरू ठेवण्यात आला.
 
यावेळी भगीरथ भालके, शिवाजीराव काळुंगे, नारायण गोवे, सुरेश कोळेकर, मारुती वाकडे यांची भाषणे झाली. यावेळी आ. राम कदम यांनी महिला व मुलीबददल अवमानकारक भाषा वापरल्याचा निशेष त्यांच्या फलकाला काळे फासण्याचा लावून निशेध करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com