मोहोळ - एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत पहिल्या आलेल्या विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजवंदन

देवकते यांजकडुन
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) - शिरापूर येथील अंबिका विद्यामंदीर येथील प्रशालेत एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत पहिल्या आलेल्या योगेश्वरी उत्तम मसलकर या विद्यार्थिनीच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजवंदन करण्यात आले.

मोहोळ (सोलापूर) - शिरापूर येथील अंबिका विद्यामंदीर येथील प्रशालेत एस.एस.सी.बोर्ड परिक्षेत पहिल्या आलेल्या योगेश्वरी उत्तम मसलकर या विद्यार्थिनीच्या हस्ते भारतीय स्वातंत्र्यदिनानिमीत्त ध्वजवंदन करण्यात आले.

मोहोळ तालुक्यातील शिरापूर सो येथील  अंबीका विद्यामंदीर येथील प्रशालेत गेल्या अनेक वर्षापासुन विद्यार्थ्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबविल्या जातात. त्यापैकी १५ ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी १०वी बोर्ड परिक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याकडुन तर २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी द्वितीय आलेल्या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते. याच परंपरेला अनुसरून यावर्षीचा स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनाचा मान योगेश्वरी मसलकर या विद्यार्थिनीला मिळाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन बोलाविलेल्या याच शिरापूरचे भुमिपुत्र व शाळेचे माजी विद्यार्थी, तसेच आंतरराष्ट्रीय ख्यातीचे  चित्रकार शशीकांत धोत्रे याचबरोबर शिरापूरमधीलच तरूण उद्योजक, स्पेनका वॉटरचे चेअरमन  सुहास आदमाने यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी विद्यार्थीनींना खाऊ व बक्षिस वाटप करण्यात आले .  यावेळी बहुसंख्य माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थीत होते. ब्प्रास्ताविक  मुख्याध्यापक बी .जी . कुलकर्णी यांनी तर सुत्रसंचालन सौदागर  चव्हाण सर यांनी केले . 

Web Title: Mohall - The flag hoisting by a student