मोहिते-पाटलांच्या 'विजय शुगर'चा लिलाव; 'या' आमदाराने मोजले 125 कोटी!

Vijaysinh-Mohite-Patil
Vijaysinh-Mohite-Patil

सोलापूर : गेल्या सहा-सात वर्षांपासून तब्बल 183 कोटींची थकबाकी असलेला करकंब (ता.पंढरपूर) येथील विजय शुगर हा कारखाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी लिलावात काढला. या लिलावामध्ये माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी या कारखान्यासाठी 125 कोटी 10 लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे बँकेचा एनपीए झपाट्याने कमी झाला आहे. 

राजकीयदृष्ट्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून बबनदादा शिंदे यांना ओळखले जाते. त्यामुळे मोहिते- पाटीलांचा करकंब येथील कारखाना शिंदेंनी विकत घेतल्याने जिल्ह्यात चर्चांना उधान आले आहे. काही वर्षांपूर्वी विविध कारणांमुळे तो कारखाना अडचणीत आला होता. जिल्हा बँकेने दिलेले सुमारे पावणेदोनशे कोटींचे कर्ज कारखान्याकडे थकीत होते. त्याचा परिणाम बँकेच्या एनपीएवर झाला होता. तसेच जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडील थकबाकीमुळे मागील काही वर्षांपासून शेती कर्जवाटप बंद होते.

या वसुलीमुळे आता जून 2020 पासून शेती कर्जवाटपाचा मार्ग मोकळा झाल्याचा विश्‍वास प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी व्यक्‍त केला. तसेच आमदार दिलीप सोपल यांच्या बार्शीतील आर्यन शुगरची वसुली सुरू करण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

काही अडचणींमुळे बंद पडलेल्या जिल्ह्यातील कारखान्यांकडील थकबाकी वसूल करण्याचे आव्हानात्मक काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. विजय शुगरचा लिलाव झाला असून आमदार शिंदेंनी तो कारखाना घेतला आहे. बँकेचा एनपीए कमी होत असल्याने आठ-दहा वर्षांपासून बंद असलेले शेती कर्ज जून 2020 पासून सुरू होईल.
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com