मोहोळ शिक्षण विभागाच्या कार्यालयाची दुरावस्था

राजकुमार शहा 
गुरुवार, 28 जून 2018

मोहोळ पंचायत समितीच्या आवारात हे कार्यालय आहे. सुमारे साठ ते सत्तर वर्षापुर्वीची ही जुनी इमारत असुन तीची डागडुजी नसल्याने तीच्या स्लॅब चे मोठमोठे तुकडे खाली पडताहेत.

मोहोळ - मोहोळ येथील पंचायत समिती आवारातील शिक्षण विभागाच्या कार्यालयाची अत्यंत दुरावस्था झाली असुन ती कधी पडेल हे सांगता येत नाही. दरम्यान रात्री सदर इमारतीच्या आडोशाला अनेक अनोळखी इसम झोपतात, जेवण करतात. त्यामुळे मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता आहे.

मोहोळ पंचायत समितीच्या आवारात हे कार्यालय आहे. सुमारे साठ ते सत्तर वर्षापुर्वीची ही जुनी इमारत असुन तीची डागडुजी नसल्याने तीच्या स्लॅब चे मोठमोठे तुकडे खाली पडताहेत. त्यामुळे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीमधील कामकाज बंद केले आहे. या इमारतीच्या व्हरांड्यात रात्री अनेक अनोळखी इसम झोपतात. तर ग्रामिण भागातून आलेले नागरीक त्या ठिकाणी जेवण करतात. त्यामुळे ही इमारत कधी ढासळेल हे सांगता येत नाही.

सध्या त्याच इमारतीच्या मागील बाजुस असलेल्या इमारतीत जाण्यासाठी रस्ताच नाही. केवळ एक माणुस कसा तरी प्रवेश करेल एवढा रस्ता भिंत पाडुन केला आहे. बाहेरून आलेल्या नवीन अधिकारी वा नागरीकांना शिक्षण विभाग कोठे आहे, हे शोधावे लागते. ही इमारत बंद असल्याने जागेचीही मोठी अडचण होत आहे. पंचायत समितीच्या बैठकीत वेळोवेळी निवेदने दिली आहेत. मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. तातडीने इमारत पाडून नवीन बांधावी अशी मागणी होत आहे.

शिक्षण विभागाने धोकादायक इमारती बद्दल निवेदन दिले  आहे मी ते जिल्हा परिषदेकडे पाठविले आहे. पाडण्याची परवानगी येताच इमारत पाडण्यात येणार आहे. - अजिंक्य येळे (गटविकास अधिकारी मोहोळ) 
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Mohol Education Department In Bad Condition