मोहोळमध्ये हॉटेलातील कामगाराचा धारदार शस्त्राने खुन

राजकुमार शहा 
गुरुवार, 26 एप्रिल 2018

हॉटेलातील कामगाराचा धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून खुन केल्याची घटना कोळेगाव शिवारातील हॉटेल सदिच्छा येथे घडली.

मोहोळ - जेवण्याच्या किरकोळ कारणावरुन एका हॉटेलातील कामगाराचा धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून खुन केल्याची घटना बुधवार ता 25 रोजी रात्री 10.45 वाजता कोळेगाव शिवारातील हॉटेल सदिच्छा येथे घडली. महेंद्र सोपान बनसोडे 40 रा. वडवळ ता. मोहोळ असे मृताचे नाव असुन चौकशीसाठी एक जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मोहोळ पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोळे गाव शिवारात हॉटेल सदिच्छा आहे. त्याठिकाणी मृत महेंद्र बनसोडे व भाऊसाहेब उतम आवारे रा. रेल्वे स्टेशन मोहोळ हे हॉटेल कामगार म्हणुन कार्यरत होते. बुधवारी रात्री या दोघात जेवणाच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे पर्यावसन मारामारीत होऊन त्यात भाऊसो आवारे याने हॉटेलच्या किचनच्या पाठीमागे पाण्याच्या टाकीजवळ महेंद्र बनसोडे यांच्या डोक्यावर व तोंडावर तीक्ष्ण हत्याराने व दगडाने मारहाण करून त्याला ठार मारले.  

याबाबत भाऊसाहेब आवारे रा. रेल्वे स्टेशन याच्या विरोधात खुन व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल केला असुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळाला उपविभागीय अधिकारी अभय डोंगरे यांनी भेट दिली असुन तपास स्वत: डोंगरे करीत आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: In Mohol a hotel worker was murdered by a sharp weapon