मोहोळ विधानसभा मतदारसंघात राजकीयनाट्याला सुरवात

mohol
mohol

मोहोळ (सोलपूर) : विधानसभेची निवडणूक आणखी वर्षभर असताना अनेकांना मोहोळ विधानसभा मतदार संघातून आमदार होण्याची स्वप्ने पडू लागली आहेत. पुणे आणि परिसरातील नगरसेवक व अन्य पदाधिकारी या मतदार संघासाठी इछुक आहेत त्यांनी तसा मतदारांशी संपर्कही सुरु केला आहे. मात्र मोहोळ येथील भाजपाचे जेष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर यांचा राष्ट्रवादी मधे प्रवेश जवळ जवळ निश्चित झाला असून तशी प्राथमिक चर्चा झाली आहे,त्यांचा प्रवेश झाला तर मात्र राजकीय समिकरणे बदलणार आहेत. स्थानिक नेतृत्वाचीही डोके दुखी कमी होणार आहे.

मोहोळ विधानसभा हा आरक्षित मतदार संघ आहे,गेल्या अनेक वर्षापासून मोहोळचा आमदार हा बाहेरचाच असल्याची परंपरा आहे, नागनाथ क्षीरसागर यांनी दोन लोकसभा व एक मोहोळ मंगळवेढा ही विधान सभा लढविली आहे त्यामुळे त्यांना निवडणुकीतील तन्त्र मन्त्र माहिती आहेत त्यांनी काही दिवस सेनेचेही काम केले आहे.पक्षांतर्गत कुरघोडिला कंटाळून ते बाहेर पडत असल्याची चर्चा आहे.तालुक्यात धनगर समाज मोठा आहे अंतर्गत काहीही अडचणी असल्यातरी धनगर समाज ऐनवेळी क्षीरसागरांच्या पाठीशी उभा राहतो हा आज पर्यन्तचा अनुभव आहे.

सध्याचे मोहोळचे आमदार रमेश कदम हे सध्या शासनाच्या ताब्यात आहेत, त्यांनी अशा परिस्थितीतही तालुक्याच्या व मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यावधिचा निधी दिला आहे.जिल्ह्यात निधी खर्च करण्यात ते आज तरी वरच्या क्रमांकावर आहेत,मात्र ऐन विधान सभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ते मतदार संघात आले तर मात्र सम्पूर्ण राजकीय चित्र बदलनार आहे,आ.रमेश कदम यांनी आज पर्यन्त कोणीही लक्ष दिले नसलेले रस्ते,मतदार संघातील गावात  पक्षभेद, गटभेद न करता हायमास्ट दिवे व अन्य विकास कामावर लक्ष केंद्रित केले आहे, त्यामुळे त्याचा फायदा त्यांना होणार आहे.

सध्या मोहोळ तालुक्यात भाजपाने तालुका अध्यक्ष सतीश काळे यांच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क वाढवला आहे, या पूर्वी भाजपाला तालुक्यात नगण्य स्थान होते मात्र काळे यांच्या कार्य कुशलते मुळे तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत,त्यात घाटने बैरेज बंधारा ,सुमारे 15 लाखाचा ओढ़ा सरळीकरण यांचा समावेश आहे.काळे यांनी आता पोखरापुर तळ्यात आष्टी तलावातून पाणी सोडण्याचे काम हाती घेतले आहे,ते काम झाले तर भाजपाचीही स्थीती मजबूत असणार आहे.

विधान सभा निवडणुकीच्या पार्श्व भूमिवर शिवसेनेने तालुका कार्यकारिणी फेर रचनेचे काम हाती घेतले आहे, या पूर्वीचे तालुका अध्यक्ष काका देशमुख यांनी तब्बल एक तप शिवसेनेचे नेतृत्व केले आहे,त्यामुळे आता नवीन तालुका अध्यक्ष कोण ?या कड़े सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोहोळ तालुका हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याची परिस्थिती होती मात्र राष्टवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे व माजी आमदार राजन पाटिल यांच्यात दुरावा निर्माण झाल्याने ती परिस्थिती आता बदलली आहे.तालुक्यात खा.धनंजय महाडिक यांचा भीमा परिवारही मोठा आहे,निवडणुकी च्या पुढे भिमा व लोकशक्ति परिवार व अन्य पक्ष संघटना एकत्र आल्यावर मात्र  राष्ट्रवादिची  दमछाक होणार आहे .यासर्व परिस्थितीवर दृष्टान्त टाकला असता येणाऱ्या विधान सभेला मोहोळचा आमदार कोण? हा प्रश्न निरुत्तरीच राहतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com