कामचुकारपणा केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल : डोंगरे

राजकुमार शहा 
सोमवार, 3 डिसेंबर 2018

मोहोळ (सोलापूर) : तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी टँकर व चारा छावणी अथवा चारा मागणीचे प्रस्ताव येतील ते दाखल करून घ्या, दुष्काळी परिस्थिती असून सर्व सामान्यांना धीर द्या, उपाययोजना करताना कोणी कामचुकारपणा केला तर त्याला कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी दिली.

मोहोळ तालुका विकास समिती व टंचाई आराखडा बैठक सभापती डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली मोहोळ पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाली त्यावेळी सभागृहाला ते मार्गदर्शन करीत होते.

यावेळी तहसीलदार जीवन बनसोडे, जी प सदस्य तानाजी खताळ, उमेश पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गट नेते अशोक सरवदे, पंस सदस्य शारदा पाटील , सुनीता भोसले, डॉ प्रतिभा व्यवहारे , माऊली चव्हाण, सभापती गावडे, विविध विभागाचे अधिकारी उपस्थीत होते.

पाणी पुरवठा विभागाने इतर तालुक्याच्या मानाने पाणी टंचाई उपाययोजनेचा आराखडा अत्यंत कमी निधीचा केला आहे. त्यामुळे अडचण येऊ शकते त्यासाठी त्याचा पुरवणी प्रस्ताव दाखल करण्याची सूचना सभापती डोंगरे यांनी पाणी पुरवठा विभागाला दिली. सध्या चारा टंचाई एवढी नाही, मात्र जानेवारी नंतर परिस्थीती अडचणीची होणार आहे, त्यासाठी उजनी कालवा, आष्टी तलाव व सिना नदीजवळील शासकीय जमिनीवर चारा लागवड करावी त्यामुळे चारा टंचाई तेवढी जाणवणार नाही.

ग्रामपंचायत विभागाचा अतीशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजे चौदावा वित्त आयोग. त्याचा निधी शिक्षण, माहिला बालकल्याण, व अपंगासाठी खर्च करावयाचा असतो, असा किती निधी खर्च केला हे डोंगरे यांनी विचारले असता अधिकाऱ्यांना काहीच सांगता आले नाही त्यामुळे डोंगरे यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. रोजगार हमी योजनेतुन तालुक्याला 447 विहीरींचे उद्दीष्ट आले आहे. पैकी 361 प्रस्ताव दाखल झाले आहेत, त्यात केवळ दहा ते अकरा प्रस्तावच परीपूर्ण आहेत, याबाबत डोंगरे यांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: Mohol meeting instructions by vijayraj dongre