मोहोळ पंचायत समितीबाबत सामान्यांतून तीव्र संताप

राजकुमार शहा 
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

मोहोळ : मोहोळ तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थिती असून, जनावरांचा चारा व पाणी यासह अन्य अडचणींचे प्रश्न असताना याचे गांभीर्य सभापतींसह कुणालाच नाही. अजेंडा मिळाला नाही म्हणून (ता. 22) आयोजित केलेली सभा तहकुब करण्यात आली. पुढील सभा येत्या शुक्रवारी (ता. 28)  आयोजित केली आहे. मात्र अद्यापही पंचायत समिती सदस्यांना अजेंडा न मिळाल्याने ती ही होणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे. सध्या पंचायत समितीमध्ये निव्वळ पोराटकी सुरू आहे. सर्व सामान्यांतून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंचायत समितीची सभा आयोजित केल्यावर सभेच्या अगोदर सात दिवस सर्व सदस्यांना लेखी पूर्व सूचना देणे क्रमप्राप्त आहे. 22 आयोजित केलेल्या सभेत दुष्काळी परिस्थितीचा आढावा, नरेगा, पाणी व चाराटंचाई या विषयावर चर्चा व उपाययोजना करण्यात येणार होती. अनेक सदस्यांना या सभेचा अजेंडा न मिळाल्याने माहितीच नव्हती. केवळ मोजकेच सदस्य उपस्थीत होते, तेही त्यांच्या कामासाठी आलेले. यावेळी सभागृहात पक्षनेते ज्ञानेश्वर चव्हाण, गटनेते अशोक सरवदे , सभापती समता गावडे यांच्यात अजेंड्यावरून खडाजंगी झाली. परिणामी सभा तहकुब करण्यात आली.

सभापती कुठलाही विषय गांभीर्याने घेत नाहीत, तालुक्यातील विविध समस्यावर चर्चा करुन त्यावर मार्ग काढण्याची त्यांची मानसिकता नाही. एखाद्या सदस्याने सरळ जरी विचारले तरी त्याला थातुरमातुर उत्तर दिले जाते. अशी काही सदस्यांची तक्रार आहे. त्यामुळे मोहोळ पंचायत समिती म्हणजे जिल्ह्यात चर्चचा विषय झाला आहे. यापूर्वीही केवळ अजेंडा न मिळाल्याने दोन वेळा सभा तहकुब करण्याचा प्रकार घडला आहे. आमच्या अडचणी सोडविण्यासाठी यांना निवडून दिले, की राजकारण करण्यासाठी असा प्रश्न सर्व सामान्यातुन विचारला जात आहे.

गेल्या मिटींगचा व शुक्रवारच्या मिटींगचा अजेंडा अद्याप मला मिळाला नाही. अजेंडा वेळेत पोच करण्याची जबाबदारी सभापतींची आहे. तालुक्यात अनेक अडचणीचे प्रश्न असताना सभापती हम करे सो प्रमाणे वागतात, नेतृत्वाने त्यांना समज दिली पाहिजे.
- अशोक सरवदे (गटनेते पंचायत समिती मोहोळ)

सभापती ना दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य नाही. सभाग्रहातील सदस्यांना व्यवस्थित बोलत नाहीत. आम्ही विरोधक आहोत, अiम्ही आक्रमक होण्याऐवजी आम्हालाच अरेरावीची भाषा वापरली जाते. ही बाब सभागृहाच्या दृष्टीने अशोभनीय आहे. आपल्याला जनतेने कामासाठी निवडुन दिले आहे, याचा विसर पडला आहे .परिस्थिती नाही सुधारली तर मात्र आम्हाला आमची भूमिका बजावावी लागेल.
-  ज्ञानेश्वर चव्हाण (पक्षनेते, पंचायत समिती मोहोळ)

Web Title: mohol panchayat samiti