मोहोळ-पंढरपूर मार्ग मृत्यूचा सापळा

mohol
mohol

मोहोळ : मोहोळ ते पंढरपूर हा चाळीस किमीचा राज्यमार्ग गेल्या वर्षभरापासून मृत्युचा सापळा बनला आहे. या मार्गावरील मोहोळ ते मगरवाडी फाटा या मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात एकूण सतरा अपघात झाले. त्यात नऊ जणांचा मृत्यु झाला आहे. तर मगरवाडी फाटा ते पंढरपुर या पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण सोळा अपघात झाले. त्यात चौदा जणांचा मृत्यू तर पंचवीस जण जखमी झाले आहेत. विषेश म्हणजे अपवाद वगळता या मार्गावरील अपघातप्रणव क्षेत्रात कोठेही दिशा दर्शक अथवा धोका दर्शविणारे फलक नाहीत.

गेल्या सन 2018 सालात या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे, या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतुक सुरु असते. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागातुन भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपूर ला येतात, तर मोठया चार वाऱ्या पंढरपूरात भरत असल्याने त्यावेळी ही भाविक मोठ्या संखेने येतात. दररोज या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकाला रस्त्याचा अंदाज असल्याने ते व्यवस्थित जातात, मात्र नवीन वाहन चालकाला रस्त्यावरील धोक्याची वळणे व इतर अपघात स्थळाचा अंदाज येत नसल्याने अपघात वाढले आहेत.

मोहोळ तालुक्यातील पोखरापुर वळण, पठाणबाबा दर्गा, माने वस्ती वळण, पाटकुल फाटा, सारोळे फाटा या ब्लॅक स्पॉटवर अपघाताचे प्रमाण जास्त आहे. तर पंढरपूर तालुक्यातील गोसावीवाडी ते देगाव या मार्गावर सर्वात जास्त अपघात झाले आहेत. 

सध्या मोहोळ - पंढरपुर ते आळंदी हा मार्ग पालखी मार्ग म्हणून शासनाने   घोषीत केला आहे ,त्याला राष्ट्रीय महामार्ग 965 असा क्रमांक ही मिळाला आहे .सध्या या मार्गाचे काम सुरू होण्याची प्रक्रीया सुरु झाली असुन ,संबंधीतानी या मार्गाचे काम करताना वळणे व इतर अपघाताची ठिकाणे कमी करून  प्रवाशांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी सर्वसामान्या मधुन होत आहे.

आकडे बोलतात
मोहोळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एकुण अपघात - 17 
मृत - 9 जखमी 24
पंढरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकुण अपघात  - 16
मृत  - 14 जखमी  25 

मोहोळ हद्दीतील ब्लैक स्पॉट -
पोखरापुर वळण 
पठाणबाबा दर्गा 
मानेवस्ती 
पाटकुल फाटा 
सारोळे फाटा 
पंढरपूर हद्दीतील ब्लैक स्पॉट 
गोसावी वाडी ते देगाव 
तुंगत वळण रस्ता 

अपघात कमी करण्यासाठी वेळोवेळी सार्वजनीक बांधकाम विभागाला कळविले आहे. वाहतुकीला आडवे येणारे फाटे तोडणे, रोडवर पांढरे पट्टे मारणे, फलक लावणे अशा उपाययोजना सुचविल्या आहेत.
- धनंजय जाधव (पोलिस निरीक्षक, पंढरपूर ग्रामिण) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com