डिजीटल फलक काढण्यासाठी मोहोळ पोलिसांकडून नोटीस

राजकुमार शहा
रविवार, 20 मे 2018

मोहोळ शहरात पाच ठिकाणी नगरपरिषदेने डीजीटल झोन तयार केले आहेत. त्याच ठिकाणी फलक लावण्याची समज अर्जदाराला दिली आहे. मोहोळ पोलिसांच्या या निर्णयामुळे भांडण होणार नाही  निर्णय योग्य व समाजहिताचा आहे. 
- रमेश बारसकर (नगराध्यक्ष मोहोळ )

मोहोळ : खंडाळी (ता. मोहोळ) आणि तुंगत (ता. पंढरपूर) येथे डिजीटल फलक लावण्याच्या कारणावरून दोन गटात जातीय तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभुमीवर मोहोळ पोलिसांनी डिजीटल फलक पक्ष संघटनेचे झेंडे याबाबत आता कडक पाऊल उचलले असुन शहरातील नगरपरिषद व तालुक्यातील 94 ग्रामपंचायतीना त्यांच्या हद्दीत असलेले विनापरवाना डिजीटल फलक त्वरीत काढण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. ग्रामपंचायत वा नगरपरिषद हद्दीत एखादी अप्रिय घटना घडल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधीत ग्रामपंचायत वा नगरपरिषद प्रशासनास जबाबदार धरण्यात येणार असल्याची तंबी देण्यात आली असल्याची माहिती मोहोळ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली. 

गेल्या आठवड्यात खंडाळी येथे महापुरुषांचे डिजीटल फलक लावण्याच्या कारणावरुन दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला होता त्या ठिकाणी कायदा व सुव्य स्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या ठिकाणी डिजीटल फलक लावायचा आहे, त्यासाठी पोलिस ठाणे वा संबंधीत विभागाकडे लेखी अर्ज दिला जातो. त्या अर्जाची सही शिक्याची पोहोच घेतली जाते. मात्र पोहोच हिच परवानगी असा गैरसमज संबंधीत कार्यकर्ता व अर्जदाराचा होतो. त्यामुळे कुठेही फलक लावले जातात कुठल्या जागेत फलक लावायचा याचा उल्लेख अर्जात नसतो. त्यामुळे परिसरातील व्यापारी नागरीक यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

दरम्यान प्रत्येक ग्रामपंचायत व संघटनेने डिजीटल झोन ठरवावे व त्याच ठिकाणी फलक झेंडे लावण्याची समज संबंधीताना द्यावी. डिजीटल फलकामुळे जातीय तेढ वा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित ग्रामपंचायत व संघटनेला जबाबदार धरण्यात येणार असल्याचे नोटिसीत नमुद केले आहे.

मोहोळ शहरात पाच ठिकाणी नगरपरिषदेने डीजीटल झोन तयार केले आहेत. त्याच ठिकाणी फलक लावण्याची समज अर्जदाराला दिली आहे. मोहोळ पोलिसांच्या या निर्णयामुळे भांडण होणार नाही  निर्णय योग्य व समाजहिताचा आहे. 
- रमेश बारसकर (नगराध्यक्ष मोहोळ )

Web Title: Mohol police action against digital board