तरुणाईचा दृष्टिकोन विकासात्मक - डॉ. आमटे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मोहोळ - 'आजच्या तरुणाईचा दृष्टिकोन विकासात्मक होत चालला आहे. अनेक वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांमध्ये तरुणाई स्वतःहून उत्स्फूर्त सहभागी होत आहे. हे निश्‍चितच आधुनिक भारतासाठी आशादायी चित्र आहे. उपेक्षितांसाठी काम करण्याची प्रेरणा मी बाबांपासून घेतली. या कार्यातून मला आत्मिक समाधान मिळते,'' असे प्रतिपादन डॉ. प्रकाश आमटे यांनी बुधवारी केले.

वैद्यकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात आदिवासींसाठी उल्लेखनीय कार्य केलेल्या डॉ. आमटे यांना कै. वसंतराव गरड धन्वंतरी पुरस्कार सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू इरेश स्वामी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते. या वेळी डॉ. आमटे यांनी उपस्थितांना आदिवासी भागातील, वैयक्तिक आयुष्यातील अनेक चित्तथरारक अनुभव सांगितले. व्यासपीठावर डॉ. मंदाकिनी आमटे, कुलगुरू इरेश स्वामी आदी उपस्थित होते.

तीस हजार जाहीर
डॉ. प्रकाश आमटे यांच्या सामाजिक संस्थेस यंदापासून प्रत्येक वर्षी डॉ. वसंतराव गरड यांच्या स्मरणार्थ 30 हजार रुपये देणगी देणार असल्याचे संस्थेचे सचिव प्रतापसिंह गरड यांनी जाहीर केले.

Web Title: mohol solapur news Youthful approach developmental