मोहोळ (सोलापूर) - पोलिस पथकाची जुगार अड्यावर धाड

mohol
mohol

मोहोळ (सोलापूर) - येथील मेहबूब नगर परिसरातील जागेत सुरु असणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पोलिस पथकाने छापा टाकून त्यामध्ये २६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून २९ मोबाईल सह  १२ मोटार सायकली रोख रक्कम असा एकुन पाच लाख  चोवीस हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना सोमवार ३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्यावरही जागा वापरासाठी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मुळे शहरा सह तालुक्यातील दोन नंबर धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या मेहबूब नगर परिसरातील नगराध्यक्ष रमेश  बारसकर यांच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने दिनांक ३ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकून सव्वीस जणांना ताब्यात घेतले आहे.   

त्यामध्ये अरूण सदाशिव शिंदे अनगर, शिवशंकर सदाशिव  चव्हाण कुरणवाडी, प्रेमानंद महादेव मोहरे राहणार वाणी गल्ली, मोहोळ, योगेश प्रकाश जाधव राहणार कुरुल, मोहम्मद इब्राहिम बागवान, सोमराय नगर, शशिकांत प्रभू सनगर, गवत्या मारूती चौक, संतोष किसन सदरे देशमुख गल्ली, बालाजी ज्ञानेश्वर जाधव कुरुल, उमेश दत्तू पारवे सय्यद वरवडे, नाना लक्ष्मण जाधव यावली, युवराज अशोक कापुरे कोळेगाव, बाळासाहेब विठ्ठल गायकवाड चौमुखी मारुती गल्ली, सत्यवान जनार्दन कादे आदर्श चौक, फकरुद्दीन सरदार मुजावर दत्तनगर, सुभाष शिवलींगप्पा कडगंची गुलबर्गा, रविंद्र नागनाथ विभुते भुसार पेट, हसन कमृद्दिन तलफदार मेहबूब नगर, इरफान गुलाब बागवान बागवान चौक, अचित बब्रुवान गायकवाड गायकवाड वस्ती, अजय तानाजी देशमुख, मरगु अंबादास धोत्रे वडर गल्ली, सुमित तुकाराम पवार नागनाथ गल्ली, संतोष मारुती धोत्रे वडर गल्ली, अमोल नरसिंह कुर्डे नागनाथ गल्ली, शरफोधीन अफजल तव्वकल सिद्धार्थ नगर, मोहन महादेव चोरमले दत्तनगर, आदी सव्वीस जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून बारा मोटारसायकली २९ मोबाईल व रोख रक्कम असा एकूण पाच लाख चोवीस हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई सोलापूर ग्रामीण पोलिस पथकाचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे मार्गदर्शना खाली करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com