मोहोळ तालुका वृक्षलागवडीसाठी सज्ज

राजकुमार शहा 
मंगळवार, 26 जून 2018

मोहोळ (सोलपूर) : शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी मोहोळ तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग सज्ज झाला असुन विविध वृक्ष लागवडीसाठी 28 हजार खड्डे खणुन तयार झाले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय देशपांडे व वनरक्षक मंजुषा घावटे यांनी दिली. 

मोहोळ (सोलपूर) : शासनाच्या तेरा कोटी वृक्ष लागवड योजनेअंतर्गत वृक्ष लागवडीसाठी मोहोळ तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभाग सज्ज झाला असुन विविध वृक्ष लागवडीसाठी 28 हजार खड्डे खणुन तयार झाले असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय देशपांडे व वनरक्षक मंजुषा घावटे यांनी दिली. 

जिल्ह्यात तसेच ग्रामिण भागात विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे त्यामुळे पर्यावरण संतुलन ढासळले आले त्याचा परिणाम पर्जन्यमानावर झाला असून वरचेवर पर्जन्यमान कमी झाले आहे तर वृक्षतोडीमुळे जमिनीची धुप मोठया प्रमाणात होऊ लागली आहे. पर्जन्यमान कमी झाल्याने भुगर्भातील पाण्याची पातळी घटली आहे हे सर्व निसर्गचक्र सुरळीत होण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. 

सामाजिक वनीकरण विभागामार्फत चालु हंगामात निम आवळा चिंच करंज सिताफळ शिरस कांचन सावर अशा औषधी व मानवोपयोगी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यापुर्वी लागवड केलेले वृक्ष मोठे झाल्याने व दडण झाल्याने तालुक्याच्या पापरी खंडाळी  देवडी कामती नजिक पिंपरी या भागात हरिण काळवीट ससे खोकड लांडगे मोर आदी प्राण्यांची संख्या वाढली आहे. चालु हंगामात केलेल्या वृक्ष लागवडीमुळे त्यांच्या संखेत वाढ होणार असुन त्याची पर्यावरण संतुलनासाठी  मोठी मदत होणार आहे.

दरम्यान वृक्ष लागवड कार्यक्रमाच्या अंमलबजावणी साठी व मार्गदर्शनासाठी एक तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.

अशी आहे समिती -
------------------
प्रांताधिकारी      अध्यक्ष 
तहसीलदार        सदस्य 
गटविकास अधिकारी    सदस्य 
वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण        सदस्य सचिव 
जास्तीत जास्त नागरीकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन सामाजिक वनीकरण विभागातर्फे करण्यात आले आहे

Web Title: mohol tehsil ready for tree plantation