माने टोळीला मोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

सांगली - दरोडा, चोरी, लूट, हाणामारी, सरकारी कामात अडथळा आणणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अभिमान ऊर्फ बाळू विठ्ठल माने याच्या टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी त्याला पूर्वपरवानगी दिली असून त्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, ‘‘२ सप्टेंबर २०१६ रोजी सचिन पांडुरंग माने (मिरज) याने बाळू माने याच्याविरुद्ध फिर्याद दिली होती. त्यानुसार बाळू माने याच्याकडून सचिन याने घर बांधण्यासाठी वाळू खरेदी केली होती. त्याचे २० हजार रुपये ठरले होते. पैकी १० हजार रोखीने दिले तर १० हजार रुपयांच्या बदल्यात ट्रकसाठीचे ॲरिअर देऊ केले. तेथे व्यवहार संपला होता, मात्र एक वर्षानंतर बाळू माने याने मागचे दहा हजार रुपये दे, असा तगादा लावून काठीने व लाथा-बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. सचिन याच्या खिशातून मोबाइल आणि २७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. बाळू माने व त्याच्या टोळीकडून असे प्रकार सातत्याने केले जात असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यामुळे त्याच्याविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, असा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक नांगरे-पाटील यांच्याकडे पाठविला होता. या टोळीत परशराम किसन लोखंडे (वय १९, रा. पाण्याच्या टाकीजवळ, सुभाषनगर मिरज), जितेंद्र बाळू लोखंडे (वय १९, रा. सुभाषनगर), भीमराव तमान्ना नंदीपाले (वय ४५, रा. नंदीवाले वसाहत, सुभाषनगर) या अन्य तिघांचा समावेश आहे. सध्या बाळू माने हा फरार असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यासाठी हालचाली करण्यात येतील. या प्रकरणाचा तपास पोलिस उपाधीक्षक धीरज पाटील करत आहेत. 

सलग तिसरी कारवाई
पोलिस अधीक्षक शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत ही तिसरी कारवाई केली. पहिली कारवाई दुर्गेश पवार या कुख्यात गुंडाच्या टोळीविरुद्ध केली. दुसरी कारवाई जत तालुक्‍यातील विजय शिंदे याच्या टोळीविरुद्ध केली. मोकासारख्या कारवाईतून गुन्हेगारी विश्‍वावर वचक ठेवण्याचा आणि समाजात सकारात्मक संदेश पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे अधीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले.

Web Title: mokka to mane gang in sangli district