पोलिस कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा 

परशुराम कोकणे
रविवार, 6 मे 2018

सोलापूर - सोरेगाव येथील आरोग्यसेविकेच्या मोबाईलला एसएमएस पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलातील संदीप पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संदीप हा पंढरपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. चार ते पाच महिन्यांपासून आरोग्यसेविका असलेल्या महिलेच्या मोबाईलला संदीप एसएमएस करत आहे. तू मला बोलत जा, तू नाही बोलली तर मी आपले आठ वर्षांपासून संबंध आहेत असे तुझ्या घरच्यांना सांगेन, तू मला भेटली नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करेन अशी धमकीही त्याने दिली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी सैफुल परिसरात मोबाईलचे सीमकार्ड आणण्यास गेल्यानंतर संदीप याने त्या महिलेस अडविले.

सोलापूर - सोरेगाव येथील आरोग्यसेविकेच्या मोबाईलला एसएमएस पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिस दलातील संदीप पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संदीप हा पंढरपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. चार ते पाच महिन्यांपासून आरोग्यसेविका असलेल्या महिलेच्या मोबाईलला संदीप एसएमएस करत आहे. तू मला बोलत जा, तू नाही बोलली तर मी आपले आठ वर्षांपासून संबंध आहेत असे तुझ्या घरच्यांना सांगेन, तू मला भेटली नाही तर विष प्राशन करून आत्महत्या करेन अशी धमकीही त्याने दिली आहे. चार-पाच दिवसांपूर्वी सैफुल परिसरात मोबाईलचे सीमकार्ड आणण्यास गेल्यानंतर संदीप याने त्या महिलेस अडविले. तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणून संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून जीवाला धोका असल्याची फिर्याद महिलेने पोलिसात दिली आहे.

Web Title: Molestation crime on police