कडेगावात सावकाराची तरुणाला अमानुष मारहाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कडेगाव - अवैध व्याज वसुलीसाठी येथील कुख्यात सावकाराने तरुणाला शिवीगाळ करीत पट्टयाचे फटकारे मारत अमाणुष मारहाण केली.  व्याज-मुद्दल दे नाहीतर जीवंत ठेवणार नाही अशी धमकी त्याने पोलिस ठाण्याच्या साक्षीने दिली. पोलिस ठाण्यापासून अवघ्या दोनशे फुटावर हा प्रकार घडला. झिरो पोलिस म्हणूनही कार्यरत असणाऱ्या या मुजोर सावकारावर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर येथील एका चोवीस वर्षीय तरुणाने आपल्या कौटुंबिक आर्थिक अडचणीमुळे कडेगाव पोलीस ठाण्याजवळ राहणाऱ्या या सावकारांकडून गेल्या तीन वर्षापुर्वी ५ हजार रुपये व्याजाने घेतले होते.  मासिक १५ टक्के व्याज आणि व्याजाची ७५० रुपये रक्कम तो प्रति महिन्याच्या आठ तारखेला घेत होता. गेल्या तीन वर्षात या तरुणाने व्याज व दंडासह ३० हजारांची परतफेड केली आहे. तरीही त्याचा वसुलीचा तगादा सुरुच आहे.  या मुजोराने तीन दिवसापुर्वी त्या तरुणाला कडेगाव पोलिस ठाण्याजवळ असलेल्या आपल्या घरात बोलावून घेतले. त्यावेळी व्याज देण्याची ठरलेली तारीख ओलांडल्याबद्दल जाब विचारला. तु तू मै मै झाल्यानंतर त्याने कातडी पट्ट्याचे फटकारे मारत बेदम मारहाण केली.  या सावकाराने गावातील अनेकांना अशीच अमाणूष वागणूक दिली आहे. या तरुणाने यापुर्वी एकदा व्याजाचे पैसे वेळेत दिले नाहीत म्हणून मारहाण केल्याचे सांगितले.

Web Title: Money Lender Beating to Youth Crime