सावकारी पाश वाढला दुपटीने

भूषण पाटील
रविवार, 3 जून 2018

कोल्हापूर - बेकायदेशीर सावकारकी बरोबरच फायनान्स कंपनी, खासगी भिशी अशा माध्यमातून लोकांची आर्थिक लूट केली जाते. वर्षात असे गुन्हे दुपटीने वाढल्याचे पोलिसांची आकडेवारी सांगते. नरतवडे (ता. राधानगरी) येथील अशोक साताप्पा सुतार यांनी काल खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. यानिमित्ताने खासगी सावकारीचे भयानक वास्तव पुढे आले. 

खासगी सावकारांची पिळवणूक होत असूनही भीतीने लोक पोलिसांपर्यंत जात नाहीत. यामुळेच खासगी सावकारांचे धाडस वाढत आहे.

नवीन व्यवसाय, मुला-मुलींचे लग्न, सण यासह गरजेच्या वस्तू खरेदीसाठी लोकांना पैशाची गरज असते. बॅंकांकडून कर्ज पुरवठा होत असला तरीही कागदपत्रांमुळे, अटींमुळे तिकडे कानाडोळा केला जातो. परिणामी खासगी सावकारांचे फावते. यातूनच अव्वाच्या सव्वा व्याजाची वसुली करून कर्जदारांची पिळवणूक केली जाते. साधारण पाचपासून चाळीस टक्‍क्‍यांपर्यंत व्याजाची आकारणी केली जाते. अनेक वेळा कर्जदाराची परिस्थिती पाहून पठाणी व्याजाचा तगादा लावला जातो. पैश्‍याच्या वसुलीसाठी सावकारांकडून महिलांचा आणि फाळकूटदादांचा वापर केला जातो. 

कायद्यानुसार...
* जिल्ह्यात परवानाधारक सावकार -२२५  
*वार्षिक १२ टक्‍केपर्यंतच व्याजाची मुभा
*२०१४ च्या नवीन कायद्यानुसार दरवर्षी परवाना नूतनीकरण हवे
* कायद्याचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कारावास, आर्थिक दंडाची शिक्षा

खासगी सावकारकीची पद्धत -
*कोरे धनादेश घेणे 
*स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेणे
*वाहन, अन्य वस्तू ताब्यात घेऊन व्यावसायिक वापर करणे 
*कर्जदार त्यांच्या कुटुंबीयांना धमकावणे
*महिलांना वसुलीसाठी पाठवणे
*फायनान्स कंपन्या आणि खासगी भिशीच्या आडून सावकारी

दाखल गुन्हे असे 
जानेवारी ते डिसेंबर २०१७ 
 दाखल गुन्हे - ६ 
 कारवाई संख्या - ८  
जानेवारी ते मे २०१८  
 दाखल गुन्हे १६, 
 कारवाईची संख्या १८

Web Title: money lender loot crime