गहाळ कागदपत्रासह रक्‍कम रिक्षाचालकाकडून परत 

riksha
riksha

सांगली : कोरोनामुळे रिक्षाचालकांच्या वाट्याला हलाखीचे जीवन येत असताना प्रामाणिकपणाचे दर्शनही घडले. अजिंक्‍य पोपट खोत (रा. आष्टा) या विद्यार्थ्याची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे व रोख पैसे एस.टी. स्टॅंड परिसरात गहाळ झाली होती. रिक्षा चालक संघटनेचे सचिव अरुण धनवडे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ओळख पटवून ती संबंधित विद्यार्थ्याला परत दिली. 


दोन दिवसांपूर्वी धनवडे हे स्टॅंड परिसरात पहाटे रिक्षा भाडे घेऊन गेले होते. त्यावेळी रस्त्यावर पडलेली एक बॅग त्यांना आढळली. बॅगेत बुधगाव अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अजिंक्‍य खोत याची शैक्षणिक कागदपत्रे तसेच 4 हजार रुपये, पॅनकार्ड व आधार कार्ड होते. त्यांनी तात्काळ आष्टा येथील रिक्षा चालक संघटनेचे संतोष कोळी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी ओळख पटवून अजिंक्‍यकडे ती बॅग सुरक्षितपणे दिली. या प्रामाणिकपणाबद्दल जिल्हा रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com