खात्यातून गायब पैसे बँकेत जमा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

30 मार्च रोजी चार टप्प्यात पैसे गायब झाले होते. तसे संदेश मोबाईलवर आले होते. अचानक पैसे गायब झाल्याने थोरात यांना धक्का बसला.

झरे - गुळेवाडी (ता. आटपाडी) येथील सुनील थोरात यांच्या बँक ऑफ इंडियाच्या झरे शाखेतील खात्यातून गायब झालेले 18 हजार रुपये पुन्हा जमा करण्यात आले आहेत. 30 मार्च रोजी चार टप्प्यात पैसे गायब झाले होते. तसे संदेश मोबाईलवर आले होते. अचानक पैसे गायब झाल्याने थोरात यांना धक्का बसला. त्यांनी बँकेत धाव घेतली. पोलिस ठाणे गाठले. पण उपयोग झाला नाही. हतबल थोरात यांनी 'सकाळ'शी संपर्क साधला. 'सकाळ' मध्ये पैसे गायब झाल्याचे वृत्त दिले, त्याची दखल घेत 4 एप्रिल रोजी चार टप्प्यात 12790, 1625, 900, 400 रुपये असे 15 हजार 415 रुपये खात्यावर जमा करण्यात आले. तसा संदेश थोरात यांच्या मोबाईलवर आला. ते पहिल्यांदा बँकेत गेले. खात्यावरील रक्कम काढली. खात्यावर केवळ 2.60 पैसे शिल्लक ठेवलेत. पैसे गेले कसे, कुठे गेले आणि खात्यावर जमा कसे झाले? हे अजून समजले नाही. ग्रामीण भागात नागरिकांच्या तक्रारींची दखल कोणी घेत नाही. पण केवळ 'सकाळ' मुळे मला न्याय मिळाला. माझे पैसे मला परत मिळाले, असे सुनील थोरात यांनी सांगितले. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The money went missing from the account back in the bank