शासकीय स्त्रोतातून घेतलेल्या पाण्यासाठी मोजावे लागतील पैसे

राजकुमार शहा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पाटबंधारे विभागामार्फत आता विद्युत मोटारीच्या डिलिव्हरी पाईपलाच पाणी मापक यंत्र बसविले जाणार असून त्याचे पैसे ही शेतकऱ्यांनाच भरावे लागणार असून तसा शासनाचा अध्यादेश प्राप्त झाला असल्याची माहिती भीमा पाट बंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एस. पासले यांनी दिली.

मोहोळ - राज्यातील विविध कालवे, तलाव या शासकीय पाणी स्त्रोतातून पाणी वापरासाठी घेताना ते मीटर प्रमाणे पैसे देवूनच घ्यावे लागणार आहे. पाटबंधारे विभागामार्फत आता विद्युत मोटारीच्या डिलिव्हरी पाईपलाच पाणी मापक यंत्र बसविले जाणार असून त्याचे पैसे ही शेतकऱ्यांनाच भरावे लागणार असून तसा शासनाचा अध्यादेश प्राप्त झाला असल्याची माहिती भीमा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता एस. एस. पासले यांनी दिली.

सध्या पाणी वापराबाबत शासनासह सर्वच स्तरातून प्रबोधन केले जात आहे. शेतकऱ्यांना शासनाने ठिबक सिंचनाचा वापर अनिवार्य केला आहे. तर ठिबक सिंचन असल्याशिवाय उसासारख्या पिकाच्या नोंदी ही साखर कारखाने घेत नाहीत शेतीसाठी आजही ग्रामीण भागात पाण्याचा पाटाचा वापर होतो. पाणी ज्यादा दिल्याने जमिनी नापिक होवू लागल्या आहेत. त्या क्षारपडही होत आहेत. नदीकाठच्या ठिकाणी आजही घातक अशी डुबुक पद्धतीचा वापर केला जात आहे.

या सर्वांवर बंधन यावे पाणी वापर काट कसरीने व्हावा, यासाठी आता मोटारीच्या डिलिव्हरी पाइपलाच पाणी मापक यंत्र बसविण्यात येणार आहेत. त्याची आकारणी घन मिटर पद्धतीने होणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दहा हजार रुपयांचा डीडी शासनाच्या नावे काढावयाचा आहे. पाणी मापक यंत्र पद्धतही इंग्रजांपासूनच असून शेतकऱ्यांच्या जीवनात हा टर्निंग पॉइंट असल्याचे पासले यांनी सांगितले. उन्हाळी हंगामापासूनच याची अंमल बजावणी करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागाच्या तुंगत विभागाने त्यांच्या अधिपत्याखाली येणाऱ्या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना तशा प्रकारच्या नोटीसा दिल्या आहेत. त्यामुळे आता भविष्यात पाणी फुकट मिळणार तर नाहीच पण त्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे हे तितकेच खरे.

  • पाणी मापक यंत्र बसविण्याची पद्धत ही इंग्रजापासून.
  • एका यंत्रासाठी शेतकऱ्यांना भरावे लागणार 10 हजार रूपये.
  • विद्युत मोटारीच्या डिलिव्हरी पाईपलाचे पाणी मापक यंत्र बसविणार आहे.
  • पाणी किती वापरताय याची आकारणी घन मीटर पद्धतीने होणार.
  • उन्हाळी हंगामापासून अंमलबजावणी होणार सुरु.
  • 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ठिबक सिंचन बसविल्याबाबतचे सादर करावे लागणार शेतकऱ्यांना हमीपत्र.
  • निविदा मागवुन ठेकेदारांमार्फत  पाणी मापक यंत्र बसविण्यात येणार.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

  • 'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
  • शेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा. 
  • राजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.

 

Web Title: The money will be required to get water from the government sources