मॉन्सुन 22 जुनपर्यंत सक्रिय होण्याची शक्यता

सचिन शिंदे
रविवार, 17 जून 2018

कऱ्हाड ः महाराष्ट्रात उत्तरेकडील भागात हवेचा दाब १०००  हेप्टापास्कल तर दक्षिण सीमेवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल, असा अंदाज हवामानाचा अभ्यास करणाऱ्या आशय मेजरमेंटस संस्थेने वर्तवला आहे. 

कऱ्हाड ः महाराष्ट्रात उत्तरेकडील भागात हवेचा दाब १०००  हेप्टापास्कल तर दक्षिण सीमेवर १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल, असा अंदाज हवामानाचा अभ्यास करणाऱ्या आशय मेजरमेंटस संस्थेने वर्तवला आहे. 

देशात दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा ९९८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहिल, त्यामुळे  मान्सून वारे दक्षिणकडून पशिम भारताच्या उत्तरेकडील भागाकडेही मान्सूनची वाटचाल अपेक्षित आहे. २२ जून नंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे  सध्या काळात कोकणात पाऊस सुरू आहे. १९ जून रोजी उत्तरेकडील भागात पावसाला वातावरण अनुकूल बनेल व पाऊस होईल. तसेच २३ जून रोजी मराठवाडा, मध्य महाराष्टतही पावसाची शक्यता निर्माण होऊन पाऊस होईल. २५ व २६ जून या दिवशीही पावसाची शक्यता असून, तेथून पुढे महाराष्टत चांगल्या पावसाची शक्यता आहे. 

मान्सून काही प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता असली तरी अजून काही दिवस पावसाची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. येत्या मंगळवारपर्यंत कोकण, गोव्यात बहुतांशी ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात व मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात अधूनमधून पावसाच्या हलक्या स्वरूपाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना यंदा चांगला पाऊस मिळेल. मात्र सधा पिकांना पाण्याचा तान पडत आहे. अशी स्थिती असल्यास शेतकऱ्यांनी संरक्षीत पाणी द्यावे.
- राकेश नलवडे, हवामान अभ्यासक, आशय मेजरमेटस्
 

Web Title: Monson likely to be active until June 22