सोलापूर महापालिका प्रशासनाचे शंभरावर प्रस्ताव मंजुरीविना प्रलंबित 

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 17 जुलै 2018

सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले. 

सोलापूर : स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने तब्बल 100 ते 125 प्रस्ताव निर्णयाविना प्रलंबित आहेत, असे महापालिकेचे आयुक्त डॉ अविनाश ढाकणे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीच्या योजनेतून होणारा एलईडी दिव्यांचा प्रस्तावही मंजुरीविना लटकल्याचे ते म्हणाले. 

महापालिकेच्या स्थायी समिती सभापती चा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित असल्याने स्थायी समितीत होणाऱ्या विविध विषयांवरील निर्णय प्रलंबित राहत आहेत. केवळ यामुळेच महापालिका प्रशासनाचे विविध महत्त्वाचे प्रस्ताव मंजुरीविना प्रलंबित राहिल्याचे आयुक्तांनी सांगितेल. प्रस्ताव प्रलंबित असल्याने शहरातील विविध विकास कामेही प्रलंबित राहत असल्याची चर्चा महापालिका परिसरात सुरू आहे. 

स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवेळी झालेल्या गोंधळामुळे या निवडणुकीसंदर्भात तक्रार दाखल झाल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार अध्यक्षपद निवडीची ही निवड रद्द करण्यात आली. या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. यावर सुनावणी होऊन न्यायमूर्तींनी, आहे तीच निवडणूक प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले होते. या आदेशाविरुद्ध भाजपाच्या उमेदवारांनी दिलेल्या एक महिन्याच्या मुदतीत सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन आपली याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणीसाठी 17 जुलैची तारीख देण्यात आली आहे. 

जुलैच्या सभेसाठी 45 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. यामध्ये 26 विषय प्रशासनाचे होते. यामध्ये दुहेरी जलवाहिनीच्या कामासंदर्भातील प्रस्ताव, पंतप्रधान आवास योजना संदर्भातील प्रस्ताव, नगरोत्थान योजनेतील विविध रस्त्यांचे प्रस्ताव यासह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांचा होता. मात्र आजची सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आल्यामुळे प्रशासनाचे महत्त्वाचे विषय प्रलंबित राहिले. शिवाय मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले आणखी महत्त्वाचे प्रस्तावही मंजुरीविना प्रलंबित राहिल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

औज बंधाऱ्यात वीस दिवसांचा पाणीसाठा 
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज बंधाऱ्यात केवळ 1.40 मीटर तर टाकळी इंटेकवेल येथे 8 फुट पाणी शिल्लक राहिले आहे. यामधून शहराला केवळ वीस ते बावीस दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. सध्या पावसाळा सुरू असून चांगला पाऊस आला तर धरणात पाणी येईल ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी सांगणार असल्याचे डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

Web Title: more than 100 propsal are delayed by solapur municipal corporation