पंढरपूर यात्रेसाठी  १९० जादा गाड्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

कोल्हापूर - पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने यंदा १९० जादा गाड्यांची सोय केली आहे. त्यामुळे यात्रा काळात भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर होणार आहे. त्यासाठी नियोजनपूर्ण झाले असून जिल्हाभरातील अकराही आगारांकडून प्रवाशांच्या मागणीनुसार तसेच बसस्थानकावरील गर्दीनुसार जादा गाड्या उपलब्ध केल्या जाणार आहेत. 

यात्रेसाठी पश्‍चिम महाराष्ट्रातून लाखो भाविक पंढरपूरला जातात. बहुतेकजण जाताना पायीदिंडीव्दारे जातात तर परत येताना मात्र एसटी गाड्यांतून येत असतात. त्यामुळे एसटील प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे एसटीने जादा गाड्यांचे नियोजन केले आहे. पंढरपुरला जाण्यासाठी येत्या १९ जुलैपासून जादा गाड्यांची सेवा सुरू होईल. यात्रेचा मुख्य दिवस संपल्यानंतर २४  जुलैपासून परतीचा प्रवास सुरू होईल. पंढरपूरतून सर्वाधिक जादा गाड्या या प्रवासी भाविक घेऊन कोल्हापूरकडे येणार आहेत, असे नियोजन केले आहे. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर गर्दीनुसार स्वतंत्र फलाट तयार करण्यात येणार आहे. याशिवाय इचलकरंजी, आजरा, कुरूंदवाड, गडहिंग्लज आदी बसस्थानकावरूनही जादा गाड्या सोडण्यात येतील. यात्रा कालावधीत एसटीच्या मॅकनिकल विभागाचे एक पथक यात्रा मार्गावर गस्त घालणार आहेत. ज्या ठिकाणी एसटी बंद पडलेली असेल त्याची दुरस्ती जागेवर करण्यासाठी हे पथक तैनात असेल. 

Web Title: More than 190 ST bus for Pandharpur Yatra