पॉलिसी रकमेच्या आमिषाने साडेपाच लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

इस्लामपूर - वडिलांच्या पॉलिसीची रक्कम मिळवून देतो, असे सांगून दिल्लीतील तिघांनी येथील एकाची ५ लाख ६२ हजार २१९ रुपयांची फसवणूक केल्याची घटना आज उघडकीस आली. सुरेश रामचंद्र पाटील (वय ७४, रा. बोरगाव) यांनी याबाबत इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी प्रियांका पाठक, आकाश जोशी, राहुल श्रीवास्तव (दिल्ली) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

सुरेश पाटील यांना संशयित प्रियांका पाठक, आकाश जोशी, राहुल श्रीवास्तव या तिघांनी तुमच्या वडिलांच्या पॉलिसीचे पैसे तुम्हाला मिळवून देतो, असे सांगितले होते. या कारणास्तव या तिघांनी वेगवेगळ्या वेळी पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यासाठी संपर्क साधून पाटील यांच्याकडून १७ मे ते ३० ऑक्‍टोबर २०१७ या साडेचार महिन्यांच्या कालावधीत एकूण ५ लाख ६२ हजार २१९ रुपये जमा करून घेतले.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया शाखा राजापुरी दिल्ली, आर. आय. टी. सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया औरंगाबाद, आयसीआयसीआय ब्रॅंच भोगल न्यू दिल्ली, पॉलिसी सोल्युशन खाते क्रमांक ३३०८५९५१३१ यावर ब्रांदा येथील एसबीआय बॅंक या विविध खात्यांवर ही रक्कम जमा करून घेण्यात आली, परंतु आजअखेर सुरेश पाटील यांना त्यांच्या वडिलांच्या पॉलिसीचे पैसे या तिघांनी मिळवून दिलेले नाहीत. वेळोवेळी पैसे देऊनही पॉलिसीचे पैसे न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी आज इस्लामपूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक विश्‍वास साळोखे तपास करत आहेत.

Web Title: more than 5 lakhs fraud in Policy money