मिरजेत मोकाट कुत्र्यांची दोनशेहुन आधिक टोळकी 

More than two hundred groups of Mokat dogs in Miraj
More than two hundred groups of Mokat dogs in Miraj

मिरज : कोरोनाचा कहर एकीकडे तासागणिक वाढत आहेत. उपचारांची यंत्रणा तोकडी पडते आहे. साहजिकच मृतांचे प्रमाणही फारसे नसले तरी वाढते आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनावरील ताणही वाढतो आहे. याच ताणतणावात महापालिकेच्या प्रशासनासमोरही कोरोनाशिवाय काहीही काम नसल्यासारखेच आहे. 

याच कोरोनाच्या व्यापात शहरातील मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येकडेही महापालिकेचा आरोग्यविभाग ढुंकुनही पहायला तयार नाही. आणि याचा मोठा फटका सध्या महापालिकेच्या प्रशासनास बसतो आहे. मोकाट कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहांवरच ताव मारला. मिरज पढंरपुर रस्त्यावरील स्मशानभुमीला कोणतेही संरक्षण नसल्याने आणि या ठिकाणी मोकाट कुत्र्यांच्या टोळ्यांसाठी नैवेद्य, खराब झालेले अन्न असे ब-यापैकी जगण्यासाठीचे अन्न पदार्थ मिळत असल्याने या ठिकाणी किमान दोनशेहुन आधिक मोकाट कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. 

मुळात मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत गेल्या अनेक वर्षांपासुन महापालिका प्रशासन बेफिकीरच आहे. त्यामुळे शहरातील एकही रस्ता, बोळ, या भटक्‍या कुत्र्यांनी व्यापला आहे. याच कुत्र्यांनी दहा वर्षांपुर्वी वड्डीमधील एका बालिकेचा बळी घेतला आहे. याशिवाय या सहा महिन्यात किमान दिडशे ते दोनशेजणांना चावा घेऊन अथवा गाडीचा पाठलाग करुन जखमी केले आहे. मध्यंतरी रेल्वेच्या कर्मचारी संघटनेने हा विषय त्यांच्या पुण्या मुबंईच्या वरिष्ठ आधिका-यांपर्यंत नेला होता. लॉकडाऊन काळात रात्री अपरात्री कामावर जाणा-या रेल्वे कर्मचा-यांना कुत्र्यांच्या हल्ल्यांचा त्रास होत असे.

त्यामुळे अनेक मालगाड्यांना यामुळे उशीर झाल्याने मध्य रेल्वेच्या वरिष्ठांनी याची माहिती थेट जिल्हाधिका-यांपर्यंत कळविली होती. तरीही महापालिकेने याकडे दुर्लक्ष केले. अशा सगळ्या कारणांमुळे मिरज शहरातील कोरोनाच्या संकटात आता मोकाट कुत्र्यांची भर पडली आहे. मोकाट कुत्र्यांनी आता कोरोनाचे अर्धवट जळालेल्या मृतदेहांनाच लक्ष्य बनवल्याने महापालिका किमान आतातरी या मोकाट कुत्र्यांबाबत नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

मोकाट कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीशिवाय पर्याय नाही. त्यासाठी महापालिकेऐवजी सेवाभावी संस्था आणि व्यक्तींनी पुढे यावे. मुरगुड नगरपालिका क्षेत्रात असे प्रयत्न झाल्याने तेथील मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात कमी झाली.अश्‍याप्रकारेच महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची मोहिम सामाजीक स्तरावर राबवण्याशिवाय पर्याय नाही. 
- किरण नाईक, प्रकल्प आधिकारी ऍनीमल राहत, सांगली 

सांगली 
संपादन : प्रफुल्ल सुतार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com