नगर : मुळा धरणात माय-लेकाचा मृत्यू

mother and son died in Mula Dam
mother and son died in Mula Dam

राहुरी (नगर) :  मुळा धरणातील पाण्यात बुडून आज सायंकाळी नगरमधील माय-लेकाचा मृत्यू झाला. पूजा गणेश सातपुते (वय 37) व त्यांचा मुलगा ओंकार गणेश सातपुते (वय 13, दोघेही रा. नगर) अशी त्यांची नावे आहेत.

मुळा धरण पाहण्यासाठी आज गणेश सातपुते (रा. बोरुडे मळा, नगर) हे पत्नी पूजा व मुलगा ओंकार यांच्यासह आले होते. चमेली गेस्ट हाऊसजवळ धरणाच्या पाण्यात पूजा सातपुते जेवणाची भांडे धुवत होत्या. त्यांच्या शेजारी पती गणेश सातपुते उभे होते. अचानक पाय घसरून गणेश पाण्यात पडले.

गणेश यांना पोहता येत नसल्याने त्यांना वाचविण्यासाठी मुलगा ओंकार पाण्यात उतरला. या गडबडीत गणेश पाण्यातून बाहेर आले; परंतु पोहता येत नसल्याने ओंकार बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी पूजा यांनी पाण्यात उडी घेतली; परंतु दोघेही खोल पाण्यात गेल्याने बुडाले. गणेश सातपुते यांनी आरडाओरडा केला; परंतु आसपास कोणीच नव्हते. त्यामुळे त्यांना मदत मिळाली नाही. अवघ्या काही मिनिटांत वडिलांच्या समक्ष पत्नी व मुलाला जलसमाधी मिळाली.

पूजाचा मृतदेह फुगून पाण्यावर तरंगत होता; परंतु ओंकारचा मृतदेह पाण्यात बुडाला होता. सायंकाळी सातच्या सुमारास स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

 

घटनास्थळी हे अपघाती ठिकाण आहे, असा फलक लावलेला आहे. कुणीही धरणाच्या पाण्यात उतरू नये, अशी सूचना फलकावर आहे; परंतु त्याकडे पर्यटक दुर्लक्ष करतात. धरणाच्या पाण्याजवळ पर्यटकांनी जाऊ नये. काळजी घ्यावी.
- मुकुंद देशमुख, पोलिस निरीक्षक, राहुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com